Home Maharashtra Maharashtra | राज्यात सहा दिवसात 4 लाख 42 हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त

Maharashtra | राज्यात सहा दिवसात 4 लाख 42 हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त

पुणे येथील सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई ब्यूरो: कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज 71 हजार 736 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुणे येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ होत आहे. दररोज किमान 60 हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी 18 एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक 68 हजार 631 इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. आठवडाभरानंतर मात्र रुग्णसंख्येत जास्तीची वाढ झालेली आढळून आली नाही मात्र दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर आहे. त्याप्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, हि दिलासा देणारी बाब ठरली आहे.

आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्स यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी बळ मिळत आहे. दैनंदिन नविन रुग्णांच्या संख्येइतकेच बरे होणाऱ्यांची संख्या असल्याने नागरिकांच्या मनावरील ताण काहीसा कमी होताना दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 20 एप्रिलला 54 हजार 224 रुग्ण घरी सोडण्यात आले. त्यानंतर 21 एप्रिलला 54 हजार 985, 22 एप्रिलला 62 हजार 298, 23 एप्रिलला 74 हजार 45, 24 एप्रिलला 63 हजार 818, 25 एप्रिलला 61 हजार 450 आणि आज 26 एप्रिल रोजी 71 हजार 736 असे एकूण 4 लाख 42 हजार 466 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here