Home Health डॉ. आंबेडकर जयंती निमित्त ‘भीमराज की बेटी’ ने केले रक्तदान

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त ‘भीमराज की बेटी’ ने केले रक्तदान

नागपुर ब्यूरो : कोरोना च्या वाढत्या प्रदुरर्भावा मुळे आज संपूर्ण भारतात रक्त पिशवी चा पुरवठा कमी झालेला आहे. हा तुटवडा पूर्ण करण्याकरीता भीमराज की बेटी या टीम ने जणू विडाच उचलला व १४ एप्रिल २०२१, महामानव, भारतरत्न प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

भीमराज कि बेटी आयोजित, महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रित्यर्थ रक्तदान शिबिर कल्पतरु बुद्ध विहार इथे भदंत प्रियदर्शि महाथेरो, पूर्व आमदार व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस उपाध्यक्ष प्रकाश गजभिये, नगरसेवक वंदना भगत व डॉ खंडेलवार यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सुमित गजभिये, शालिक जिल्हेकर, सुशिल गेडाम, रानू खोब्रागडे, निखिल बोरीये अक्षत धुरवास, उज्वला गणवीर, रेवती पाझारे, वंदना वनकर, डॉ नीना डोंगरे, प्रिया मेश्राम यांनी मेहनत घेतली.