Home Maharashtra देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सध्या लूज बॉल मिळताहेत, त्यांना सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘सध्या लूज बॉल मिळताहेत, त्यांना सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते’

मुंबई ब्युरो : सध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. त्यांना मला सीमारेषेबाहेर पाठवावेच लागते, अशा शब्दात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटच्या मैदानातून फटकेबाजी केली आहे. वडाळा विधानसभा मतदार संघात आज भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तर्फे आमदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या आमदार चषकाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी फलंदाजी करत काही फटके देखील लगावले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला हल्ली सर्व लूज बॉल येत आहेत, बॅटिंग करायला मजा येतेय, मी बॉडिलाईन गोलंदाजी करत नाही, योग्य पद्धतीनं खेळतो.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला बॅटिंग करायला मजा येते. लहानपणी मी बॅटिंग-बॉलिंग दोन्ही करायचो. फिल्डिंग कमी करायचो पण ज्यावेळी करायचो त्यावेळी कॅच सुटायचे नाहीत. माझे ठरले आहे की, मी पेस बॉलिंग करणार मी गुगली पण टाकणार आहे. आणि जेंव्हा बॅटिंग का येईल ती ही चांगली करेन. मी योग्य बॉल टाकतो. मी शॉटपिच बॉलिंग करतो. त्याने समोरच्यांना खेळायला अडचण होत आहे.

यूपीएचे कॅप्टन बदलण्याच्या विषयावर बोलताना फडणवीस म्हणाले की, कॅप्टन बदलावर 16 वा गडी बोलत आहे. त्याच्या म्हणण्याला अर्थ नसते, त्यासाठी टीममध्ये असावं लागतं. यावेळी ते म्हणाले की, चौकशी कुणाची करायची असतें, ज्यांनी चोरी केली त्यांची की ती सापडून देणाऱ्याची. ज्यांनी चोरी केली त्यांना मोकाट सोडू आणि ज्यांनी पकडून दिली त्यांची चौकशी करु हा या सरकारचा न्याय आहे.

फडणवीस म्हणाले की, हे सरकार रश्मी शुक्ला यांच्या विरोधात चौकशी करणार आहे. एका महिला अधिकाऱ्यांच्या संदर्भात या सरकारची भूमिका नक्की नेमकी काय आहे, हे समजून येत आहे. ज्या मंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात हे वक्तव्य केलं आहे, त्यांनी विचार करायला हवा की आपण एका महिलेबद्दल काय बोलत आहोत, या संदर्भात बोलताना त्यांना भान सुद्धा नाही.

Previous articleगृहमंत्री अनिल देशमुखांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे कशाची केली मागणी?
Next articleसेना में महिलाओं के परमानेंट कमिशन में भेदभाव पर सुको की सख्त टिप्पणी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).