Home Maharashtra Maharashtra । मुंबई क्राइम ब्रांचमधील 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra । मुंबई क्राइम ब्रांचमधील 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई ब्युरो : राज्याच आणि विशेष म्हणजे राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये पोलीस यंत्रणांमध्ये मागील अनेक दिवसांपासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. सध्याची अशीच एक माहिती समोर आली असून, मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच अर्थात गुन्हे शाखेमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हे बदल करण्याचा निर्णय घेतला होता. याच अनुषंगाने मुंबईमध्ये एकूण 86 अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या ज्यात 65 अधिकारी हे मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी क्राइम ब्रांचमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काहींना पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर देण्यात आली आहे. तर, काहींची साईड ब्रांचमध्ये बदली दाखवण्यात आली आहे.

क्राइम इंटेलिजन्स युनिटचे अधिकारी आणि सचिन वाझे निकटवर्तीय मानले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज काझी यांना सशस्त्र पोलीस दल या विभागात बदली देण्यात आली आहे, तर क्राइम इंटेलिजन्स युनिटचेच प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.

क्राइम ब्रांचमध्ये गेल्याकाही वर्षांपासून असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षकपदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुकेश अंबानी प्रकरण आणि सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिसांवर प्रशचिन्ह उपस्थित झालं होतं.

वाझे प्रकरणानंतर नवीन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनीच क्राईम ब्रांचमध्ये मोठे फेरबदल करत 28 पोलूस निरिक्षक, 17 सहायक पोलीस निरिक्षक आणि 20 पोलीस उप निरिक्षकांची बदली केली, तसच इतर 21 अधिकाऱ्यांची ही बदली केली गेली आहे.

वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता विशेष म्हणजे क्राइम ब्रांचची, ही प्रतिमा बदलावी यासाठी 5 वर्षांहून जास्त काळ मुंबईत काम करत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली केली गेल्याचं सांगितलं जात आहे.

तसंच, या नंतर आता नवीन आयुक्त 5 वर्षाहून जास्त मुंबईत काम करणाऱ्या पोलीस उपायुक्तांचीही बदली करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून काही मोठे फेरबदल मुंबई पोलीस दलात पाहायला मिळू शकतात.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांची होमगार्ड विभागामध्ये बदली करण्यात आली होती, त्यानंतर पोलीस महासंचालक असलेले हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली. आपला कारभार सांभाळताच हेमंत नगराळे यांनी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली ज्यामध्ये पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यावर विशेष भर दिला.

पदभार सांभाळताच नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती ज्यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्याची गरज असल्याचंही सांगितलं होतं याचाच हा एक ट्रेलर म्हणून या बदली सत्राकडे पाहिलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here