Home Maharashtra New Corona Guidelines । कोरोनाचा वाढता धोका पाहता राज्यात निर्बंध लागू

New Corona Guidelines । कोरोनाचा वाढता धोका पाहता राज्यात निर्बंध लागू

मुंबई ब्युरो : कोरोना विषाणूच्या संसर्गानं पुन्हा एकदा राज्यात डोकं वर काढल्यामुळं आता पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानुसार काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत, तर काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्याचं आर्थिक चक्र सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच राज्य शासनानं नव्यानं नियमावली जाहीर केली आहे. ज्याचं पालन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात केलं जाणं अपेक्षित आहे. 31 मार्चपर्यंत ही नवी निय़मावली राज्यात लागू करण्यात आली आहे. ज्याचं पालन केलं जाणं अनिवार्य आहे.

  1. – सर्व प्रकारची सिनेमागृह, उपहारगृह, हॉटेल 50 टक्के कार्यक्षमतेनं सुरु राहतील.
  2. या ठिकाणी मास्क योग्य पद्धतीनं न वारपणाऱ्यांस प्रवेश दिला जाणार नाही.
  3. प्रवेशाच्याच वेळी तापमानाची नोंद केली जाईल.
  4. योग्य त्या ठिकाणी सॅनिटायझरचा पुरेसा पुरवठा.
  5. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन योग्य पद्धतीनं केलं जात आहे की नाही हे पाहण्यासाठी माणसं नेमावीत.
  6. – विविध भागांमध्ये असणाऱ्या मॉलसाठीही हेच नियम लागू असतील.
  7. – अनेक माणसं एकाच ठिकाणी जमतील अशा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमाचं आयोजन करु नये.
  8. या नियमाचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याशिवाय ज्या वास्तूत या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे, ती ठिकाणंही बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.
  9. – लग्नकार्यांसाठी 50हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती नसावी.
  10. – अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांचीच उपस्थिती असावी. स्थानिक प्रशासनानं यावर काटेकोर लक्ष ठेवावं.
  11. – धार्मिक स्थळांवर एक तासात किती लोक असणार याचे नियोजन करावे, त्यानुसारच दर्शन घेता येणार
  12. – दर्शनासाठी ऑनलाईन विजिटच्या पर्यायाला प्राधान्य देण्यात यावं.
कार्यालयांसाठीचे नियम
  1. – आरोग्य आणि अत्यावश्यक सेवना वगळता सर्व कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के उपस्थितीच अपेक्षित.
  2. – कार्यालयांनी वर्क फ्रॉम होम या पर्यायाला प्राधान्य द्यावं. अन्यथा नियमांचं उल्लंघन झाल्यास कार्यालयावर बंदीची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
गृहविलगीकरणासाठीचे नियम
  1. – कोरोनाबाधितांबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात यावी. याशिवाय या माहितीमध्ये सदर व्यक्ती कोणत्या डॉक्टरांकडून विलगीकरणात राहून उपचार घेत आहे याचाही समावेश असावा.
  2. – सदर व्यक्ती असणाऱ्या ठिकाणी एक फलक 14 दिवसांसाठी ठेवण्यात यावं. ज्यामध्ये इथे कोरोनानाबाधित रुग्ण असल्याची बाब नमूद असावी.
  3. – गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांवर त्यासंबंधीचा शिक्का असावा.
  4. – विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तीच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींनीही त्यांची बाहेरी ये-जा नियंत्रणात ठेवावी. मास्करचा वापर आवर्जून करावा.
  5. – वरीलपैकी कोणत्याही नियमाचं उल्लंघन झाल्यास तातडीनं रुग्णाला स्थानिक प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येईल.
Previous articleNagpur Lockdown | “पुलिस खड़ी है डगर -डगर,आ मत जाना वर्धमान नगर”
Next articleBank Strike 2021 | खासगीकरणा विरोधात बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस देशव्यापी संप
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).