Home Maharashtra ‘अवनी’ वाघीण मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांसह इतर आठ जणांना नोटीस

‘अवनी’ वाघीण मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या सचिवांसह इतर आठ जणांना नोटीस

603

नागपूर ब्युरो : पांढरकवडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टी-1 (अवनी) या वाघिणीला ठार मारल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी विकास खरगे आणि इतर आठ जणांना नोटीस बजावल्या आहेत. ह्या नोटीस प्रकरण दाखल करून घेण्याच्या आधीच्या किंवा ज्याला नोटीस बिफोर अॅडमिशन म्हणतात त्या आहेत.


खरगेंसह प्रधान मुख्य वनसंवर्धक वन्यजीव ए के मिश्रा ह्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. अवनी वाघिणीने यवतमाळ जिल्ल्यात 2017-18 मध्ये धुमाकूळ घातला होता. 13 व्यक्तींची शिकार या अवनी वाघिणीने केली असल्याचा आरोप होता. ज्यामुळे त्या परिसरात प्रचंड दहशत होती आणि वाघिणीला मारावे अशी मागणी तिथल्या लोकांची होती. त्यावेळी विकास खरगे हे वन विभागाचे सचिव होते. सर्वोच्च न्यायालयात संगीता डोगरा ह्या वन्यजीव अॅक्टिव्हिस्टने जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी अवनीच्या शिकारीसाठी देण्यात आलेला मोबदला आणि त्यानंतर केलेला सर्व जल्लोष हा कोर्टाने ह्यात आधी दिलेल्या निर्णयाचा अवमान असल्याचे म्हटले आहे.

वन विभागाने अवनीला बेशुद्ध करून पकडण्याचे ही प्रयत्न केले होते. मात्र ते असफल होते. शिकारी नवाब शफथ अली खान ह्याच्याशी करार केला. अवनीला नवाबचा मुलगा असगर अली ह्याने गोळी घालून मारले होते. ह्या सर्वावरच बरेच वादळ उठले होते.

Previous articleआत्मनिर्भर | गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून वडिलांच्या किराणा दुकान चालवलं, आता होतेय कोट्यवधींची कमाई
Next articleआता रेल्वेच्या एसीत ‘AC 3-टियर इकॉनॉमी’ नावाचा चौथा क्लास
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).