Home National आता रेल्वेच्या एसीत ‘AC 3-टियर इकॉनॉमी’ नावाचा चौथा क्लास

आता रेल्वेच्या एसीत ‘AC 3-टियर इकॉनॉमी’ नावाचा चौथा क्लास

356
0

नवी दिल्ली ब्युरो : भारतीय रेल्वेकडून आता ट्रेनमध्ये आणखी एक क्लास आणला जाणार आहे. आतापर्यंत रेल्वेच्या एसी कोचमध्ये तीन क्लास होते. आता यात ‘एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लास’ नावाचा एक क्लास जोडला जाणार आहे. ट्रेनमध्ये या श्रेणीसाठी वेगळ्या धाटणीचे कोच बनवले जात आहेत. रेल्वेच्या कपूरथला स्थित रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये हे कोच तयार केले जात आहेत.

आता ट्रेनमध्ये एसी श्रेणीत फस्ट एसी, सेकंड एसी आणि थर्ड एसी असे तीन क्लास आहेत. आता चौथा आणखी एक क्लास देखील रेल्वेत असणार आहे. ज्याला थ्री टियर एसी इकॉनॉमी क्लास म्हटलं जाईल. थ्री टियर इकॉनॉमी क्लास अथवा थर्ड एसी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवाशांना थर्ड एसीपेक्षा कमी तिकिटदर लागणार आहे.

हा फरक असेल

1. थर्ड एसी आणि थर्ड एसी इकॉनॉमी क्लासमध्ये मुख्य अंतर असेल ते सीटचं. थर्ड एसीमध्ये 72 बर्थ असतात तर थर्ड एसी इकॉनमी क्लासमध्ये 83 बर्थ असतील. यात 11 बर्थ जास्त असतील.
2. यामुळं रेल्वेचं प्रति कोच उत्पन्न वाढणार आहे.
3. थर्ड एसीचा तिकिट दर पूर्वीपेक्षा वाढणार आहे.
4. थर्ड एसी कोचमध्ये अधिक सीट वाढवून बनवलेल्या थर्ड एसी इकॉनमी क्लासमध्ये सीट्स जरा जवळ जवळ असतील.

नवीन डब्यांची होणार ट्रायल

कोणत्याही नवीन रेल्वे इंजिन अथवा डब्यांना प्रवाशांसाठी वापरण्याआधी त्यांची चाचणी रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) कडून केली जाते. या नवीन थ्री टियर इकॉनॉमी क्लास कोचेसला देखील कपूरथलावरुन को चाचणीसाठी लखनौला पाठवण्यात येणार आहे. रेल्वेचा दावा आहे की, हे कोच जगातील सर्वात कमी किमतींचे स्वस्त एसी कोच असतील. आरसीएफकडून कपूरथलामध्ये 248 डब्बे या वर्षात बनवले जाणार आहेत.

नवीन कोचमध्ये काय असणार?

1. नवीन कोचमध्ये हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक स्विचगिअरला कोचमधून काढून ट्रेनच्या खालच्या भागात लावला आहे. त्यामुळं कोचमध्ये 11 अतिरिक्त सीट लावण्यासाठी जागा होऊ शकली.
2. यामध्ये प्रत्येक प्रवाशासाठी एक वेगळा एसी डक्ट दिला गेला आहे. ज्याला प्रवाशी आपल्या सोयीनुसार सुरु अथवा बंद करु शकतो.
3. लायटिंग चांगली करण्यात आली आहे
4. दरवाजे आणि इंटेरिअर खूप चांगलं करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here