Home Maharashtra Maharashtra । नेवासातील एका शेतकऱ्याच्या दीड लाखाच्या आफ्रिकन शेळीची चर्चा

Maharashtra । नेवासातील एका शेतकऱ्याच्या दीड लाखाच्या आफ्रिकन शेळीची चर्चा

आजपर्यंत तुम्ही म्हैस तीन लाखाला विकली गेल्याचे ऐकले होते. मात्र एका शेळीची किंमत ऐकून तुम्ही सुद्धा चकित व्हाल. हो किंमत पण तशीच आहे ! दीड लाख रुपये. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याची बोर जातीची आफ्रिकन शेळी चक्क 1 लाख 51 हजार रुपये किंमतीला विकली गेल्यानंतर ही शेळी चर्चेचा विषय ठरली आहे.


नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप मिसाळ यांचा शेती पूरक शेळी पालनाचा गोट फार्म व्यवसाय आहे. त्यांची एका शेळीची 9 फेब्रुवारी रोजी विक्री झाली. फलटण येथील शेळी पालन व्यवसाय करणारे तेजस भोईटे यांनी नेवासा तालुक्यातील भेंडा येथे येऊन शेळी खरेदी केली. या एका शेळी साठी त्यांनी चक्क 1 लाख 51 हजार रुपये किंमत मोजली आहे.

शेळी दीड लाखाला विकली गेल्याने मिसाळ यांनी फटाके वाजून आणि फेटा बांधून आनंद व्यक्त केला. शेळीला देखील या वेळी हार घालण्यात आला होता.

आफ्रिकन गोट शेळीचे वैशिष्ट्ये दिवसाला 300 ते 350 ग्रॅमने वजन वाढते. या शेळीला दिवसाला 1 किलो खाद्य लागते. त्यामुळे या शेळीला बाजारात मोठी मागणी आहे. संदिप मिसाळ यांच्याकडे 15 आफ्रिकन जातीच्या फिमेल शेळ्या आहेत. ते वर्षाला 15 ते 16 लाख रूपये कमवतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here