Home मराठी Farmer Protest | शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची चौकशी होणार

Farmer Protest | शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची चौकशी होणार

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई ब्युरो : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची आता चौकशी होणार आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचं गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे.

पॉप गायिका रिहानासह इतरांना उत्तर देताना अनेक सेलिब्रिटींनी विरुद्ध ट्वीट केलं होतं. यामध्ये सुनील शेट्टीने मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केलं होतं. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्वीटमधील शब्द आणि शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्वीट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.

ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी देखील ट्वीट केले होते. पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं.

सचिन तेंडुलकरने ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही.” बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here