Home Social Media Viral । बारामतीत सरपंचपद सात जणांनी वाटून घेतले, शपथाही घेतल्या

Viral । बारामतीत सरपंचपद सात जणांनी वाटून घेतले, शपथाही घेतल्या

559

बारामती ब्युरो : बारामती तालुक्यातील ढेकळवाडी ग्रामपंचायतीने सरपंच आणि उपसरपंच पद पाच वर्षासाठी 7 जणांनी वाटून घेतलं आहे. ते वाटून घेत असताना त्यांनी गावतीलच बुवासाहेब मंदिरात शपथ घेतली आणि हा शपथ घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

बारामती तालुक्यातील ढेकळवाडी या ग्रामपंचायतीचा शपथ घेतनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आरक्षण पदाची सोडत निघाली आणि सरपंच पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव झालं. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण सहा महिला निवडून आल्या होत्या. त्यातील चार महिला या ओबीसी प्रवर्गातील आहेत. यातील सीमा ठोंबरे 14 , सीमा झारगड 7, लक्ष्मी बोरकर 21 तर सुनीता टकले या 14 महिन्यांसाठी सरपंच असणार आहेत. तर उपसरपंच पदासाठी राहुल कोळेकर, हर्षद चोपडे आणि शुभम ठोंबरे हे प्रत्येकी 18 महिन्यांसाठी उपसरपंच असणार आहेत.

ढेकळवाडी ग्रामपंचायत ही 11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. त्यातील सात जण सरपंच आणि उपसरपंच होणार आहेत. खरं तर हे सरपंच पदाचे वाटप करताना गावातील बुवासाहेब मंदिरात महिला सरपंच पतीचा शपथविधी पार पडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही शपथ का घेण्यात आली याचा किस्सा देखील मोठा रंजक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली. देशाचा कारभार राज्यघटनेप्रमाणे चालतो. परंतु आज देखील देवाला साक्षी ठेवल्याशिवाय आपलं पान हालत नाही.

Previous articleNagpur Bulletine । पट्टे वाटपासंदर्भात प्रक्रियेला गती द्या : महापौर दयाशंकर तिवारी
Next articleMaharashtra । दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी नियम पाळणे अत्यावश्यक : मुख्यमंत्री ठाकरे
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).