Home Sports Sport । राज्यमंत्री बच्चू कडू ने अवघ्या 20 सेकंदात मारले कबड्डी चे...

Sport । राज्यमंत्री बच्चू कडू ने अवघ्या 20 सेकंदात मारले कबड्डी चे मैदान

अमरावती ब्युरो : राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एन्ट्री केल्याचे समोर आले आणि अवघ्या 20 सेकंदात त्यांनी अनेक कबड्डीपटूंना चित केलं आहे.

विशेष म्हणजे ज्या मैदानात बच्चू कडूंनी कबड्डीचे सामने खेळायला सुरुवात केली त्याच मैदानात त्यांनी हा पराक्रम याही वयात करून दाखवल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहे. अमरावतीच्या चांदुरबाजार तालुक्यातील मासोद येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः मैदानात उतरून कबड्डी खेळाचा आनंद घेतला.

आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांचा त्यांच्या बेलोरा गावात कबड्डी खेळाचा संघ होता. त्यांना असलेला कबड्डी खेळाचा छंद ते आजही जपतात. अशाच प्रकारे मासोद येथे कृषक क्रिडा मंडळद्वारे आयोजित केलेल्या कबड्डी सामन्याच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खेळाडूची भूमीका पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here