Home Maharashtra महाराष्ट्रातील 57 पोलिसांना पदक, गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक पदके

महाराष्ट्रातील 57 पोलिसांना पदक, गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक पदके

661

मुंबई ब्युरो : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारकडून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षीही गृह मंत्रालयाने पोलीस पदकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा गौरव प्रजासत्ताक दिनी होणार असून यात चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, 13 जणांना पोलीस शौर्य पदक तर 40 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलीस पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती पदक, उत्कृष्ट सेवा पदक, गुणवत्तापूर्ण सेवा पदके देऊन पोलिसांचा गौरव केला जातो. महाराष्ट्राने 57 पदके मिळून देशात तिसरं स्थान मिळवले आहे.

ठाणे पोलीस दलातील सहा जणांना पोलीस पदक

ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त निवृत्ती उर्फ एन.टी. कदम यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस उपअधीक्षक संगीता शिंदे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक जाहीर झाले. तर भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय डोळस, पोलीस मुख्यालयातील सहा.पो. उपनिरीक्षक थॉमस डिसुझा, गुन्हे शाखेचे सहा.पो. उपनिरीक्षक सुरेश मोरे आणि खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक पदके

राष्ट्रपतींचे पोलीस शौर्य पदके जाहीर झाले असून सर्वाधिक पदके गडचिरोली जिल्ह्याला मिळाली आहेत. 2018 मध्ये माओवादविरोधी कारवाईत कसनासूर बोरियाच्या चकमकीत 38 माओवादी ठार झाले होते, त्या कारवाईचे नेतृत्व करणारे तत्कालीन माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी (सध्या अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक) तसेच प्राणहीता पोलीस उपमुख्यालयाचे तत्कालीन अतिरिक्त अधीक्षक राजा (बीड येथे पोलीस अधीक्षक) या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सी-60 कमांडो पथकाच्या जवानांना ही शौर्य पदके जाहीर झाली आहेत. याशिवाय एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस हवालदार तसेच पाच पोलीस नाईक आणि 3 पोलीस अमलदार यांचा यात समावेश आहे.

यंदा देशातील 946 जणांना पोलीस पदके

यावर्षी एकूण 946 पोलीस पदके जाहीर झाली असून 89 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, 205 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि 650 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 57 पदक मिळाली आहेत

उत्तरप्रदेश पोलिसांना 8 शौर्य, 7 उल्लेखनीय सेवा तर 72 गुणवत्तापूर्ण सेवेची अशी एकूण 87 पदके मिळाली आहेत. तर जम्मू आणि काश्मीर पोलिसांना 52 शौर्य, 2 उल्लेखनीय तर 17 गुणवत्तापूर्ण सेवेची अशी एकूण 71 पदके मिळाली आहेत. याशिवाय 32 राज्याच्या पोलीस दलात सिक्कीम, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि चंदीगडला प्रत्येकी एक (गुणवत्तापूर्ण सेवा) पदक मिळाले आहे.

Previous articleNagpur | गोरेवाडा येथे ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Next article…और नागपुर के कोविड हॉस्पिटल में महिलाएं गाने लगी राष्ट्रगीत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).