Home हिंदी प्रवीण टाके नागपुरचे नवे जिल्हा माहिती अधिकारी

प्रवीण टाके नागपुरचे नवे जिल्हा माहिती अधिकारी

565

नागपूर : चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची नागपूरचे नवे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे तब्बल वर्षभरानंतर नागपूरला पूर्णवेळ जिल्हा माहिती अधिकारी मिळाले आहे.
यापूर्वी भंडार्‍याचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्याकडे नागपूरची अतिरिक्त जबाबदारी होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील गट अ व गट ब संवर्गातील अधिकर्‍यांच्या बदलीचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. यात एकूण आठ अधिकर्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.