Home हिंदी नागपूर : पोळा, मारबत उत्सवासाठी दिशानिर्देश

नागपूर : पोळा, मारबत उत्सवासाठी दिशानिर्देश

650

नागपूर: नागपूर शहरात पोळा, तान्हा पोळा आणि मारबत उत्सव परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यंदाचे वर्ष हे कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या संकटाचे वर्ष आहे. त्यामुळे सार्वजनिक उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा करणे, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.

गर्दीमुळे कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदाचा पोळा, तान्हा पोळा आणि मारबत उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करता येणार नाही. यासंदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश निर्गमित केले आहेत. परंपरेनुसार जे आवश्यक आहे ते दिशानिर्देश आणि नियमांचे पालन करीत तसेच पोलिस किंवा संबंधित विभागाच्या पूर्वपरवानगीने करावे, असे आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.