Home Election Gram Panchayat Election : गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 82.18 टक्के मतदान

Gram Panchayat Election : गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 82.18 टक्के मतदान

गडचिरोली ब्यूरो : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ऐतिहासिक मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. नक्षलग्रस्त जिल्ह्यात एकूण 82.18 टक्के मतदान झाले आहे. शुक्रवारी झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यातील मतदान दुपारी 1.30 वा.पर्यंत 70.16 टक्के नोंदविले गेले होते. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहा तालुक्यातील प्रत्यक्ष मतदान झालेल्या 170 ग्रामपंचायतींमध्ये अंदाजे 82.18 टक्के मतदान झाले आहे. अंतिम आकडेवारी शुक्रवारी दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. या मतदानात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली आणि धानोरा या तालुक्यातील 170 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणूका झाल्या.

जिल्हयातील अंदाजित अंतिम आकडेवारी
  1. कोरची 14 ग्रामपंचायती – 79.55 टक्के (एकुण-10957- पु.5583 स्त्री.5374)
  2. कुरखेडा 39 ग्रामपंचायती – 84.09 टक्के (एकुण-39726 – पु.20454 स्त्री.19272)
  3. देसाइगंज 17 ग्रामपंचायती – 84.49 टक्के (एकुण-30338- पु.15474 स्त्री.14864)
  4. आरमोरी 27 ग्रामपंचायती – 80.30 टक्के (एकुण-38881- पु.19738 स्त्री.19143)
  5. गडचिरोली 43 ग्रामपंचायती – 83.42 टक्के (एकुण-47769- पु.24476 स्त्री.23293)
  6. धानोरा 30 ग्रामपंचायती – 78.11 टक्के (एकुण-22472- पु.11551 स्त्री.10921)
  7. एकुण 170 ग्रामपंचायती – 82.18 टक्के (एकुण-190143- पु.97276 स्त्री.92867)
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.

ग्रामपंचायत निवडणूक एक दृष्टिक्षेप

• निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
• प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
• एकूण प्रभाग- 46,921
• एकूण जागा- 1,25,709
• प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
• अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
• वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
• मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
• बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
• अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here