Home मराठी Nagpur | मांजा विक्रेत्यांसह पतंगबाजांवरही मोठी कारवाई

Nagpur | मांजा विक्रेत्यांसह पतंगबाजांवरही मोठी कारवाई

601

दहाही झोनमध्ये उपद्रव शोध पथकाची धडक

नागपूर ब्यूरो : नॉयलॉन मांजावर आणि प्लास्टिक पतंगांवर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री होत असल्याचे लक्षात येताच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार मनपाच्या दहाही झोनमधील उपद्रव शोध पथकाने ठिकठिकाणी धाडी टाकल्या. नॉयलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसह नॉयलॉन मांजाने आणि प्लास्टिक पतंग उडविणाऱ्या व्यक्तींवरही मोठी कारवाई गुरुवारी (ता. 14) करण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ४२४ दुकानांची उपद्रव शोध पथकाने तपासणी केली. यात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आणि प्लास्टिक पतंग विकणाऱ्या ५५ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. नॉयलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाऱ्या २५० व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत सुमारे ४०४८ पतंग, १०७ चक्री जप्त करण्यात आल्या. या कारवाईत ५५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सर्वाधिक कारवाई आशीनगर झोनमध्ये

नॉयलॉन मांजा आणि प्लास्टिक पतंगविरोधात उघडलेल्या मोहिमेमध्ये गुरुवारी दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक ७० दुकाने आशीनगर झोनमध्ये तपासण्यात आली. यापैकी तब्बल २१ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. पतंगबाजांवरील कारवाईमध्ये मंगळवारी झोन अव्वल असून सर्वाधिक ३५ पतंगबाजांवर या झोनमध्ये कारवाई करण्यात आली.

Previous articleभारतीय सेना के मेजर ने बनाई दुनिया की पहली यूनिवर्सल बुलेटप्रूफ जैकेट ‘शक्ति’
Next articleएनयुएचएमचे प्रस्ताव तीन दिवसात तयार करा : महापौर दयाशंकर तिवारी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).