Home Maharashtra पेट्रोल व डिझेल दरवाढी संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात रायुकां चे आंदोलन

पेट्रोल व डिझेल दरवाढी संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात रायुकां चे आंदोलन

594

अमरावती ब्यूरो : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष महेबूबभैय्या शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतदादा वरपे ,प्रदेश कार्याध्यक्ष सूरजदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनात डिझेल व पेट्रोल दरवाढी संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती च्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालया समोर मोटर सायकल ढकलत व तीन चाकी रिक्षात मोटरसायकल बांधून घेऊन जनसामान्यांच्या हिताकरिता अनोख्या प्रकारे आंदोलन केले, या आंदोलनाला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात डिझेल व पेट्रोलच्या किंमती वाढवल्यामुळे शेतकरी व जनसामान्यांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या या कार्यकाळात बऱ्याच प्रमाणात डिझेल पेट्रोलच्या दरात अनावश्यक वाढ झाली असून ती जनसामान्यांच्या हिताचे नाही. या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण सुनीलभाऊ व-हाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष राजाभाऊ महल्ले,जिल्हा कार्याध्यक्ष भास्करराव ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराव ठाकरे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष गुड्डू भाऊ धर्माळे, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई ठाकरे ,सेवादल जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कोकाटे, वकील सेल जिल्हाध्यक्ष मधुसूदनभाऊ माहुरे, प्रदीपभाऊ राऊत ,कल्पनाताई वानखडे,जिल्हा महासचिव अजयराव लेंडे,रंजीत भाऊ काळबांडे ,धीरजभाऊ श्रीवास , राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष निखील भाऊ ठाकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश महासचिव गजाननराव रेवाळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा शहराध्यक्ष निलेशभाऊ शर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ग्रामीण प्रा.डॉ. सुशील गावंडे,जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रथमेश ठाकरे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष आकाश हीवसे, ग्रंथालय जिल्हाध्यक्ष कपिल तिडके, ग्रंथालय जिल्हा शहराध्यक्ष राहुल राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष विपिन शिंगणे, महासचिव जिल्हा साहिल सोलव ,जिल्हा चिटणीस कुणाल विधळे,धीरज निंभोरकर बडनेरा विधानसभा अध्यक्ष कपिल यादगिरी,राष्ट्रवादी युवक अमरावती शहर उपाध्यक्ष राजाभाऊ डीवरे, तालुकाध्यक्ष नांदगाव खंडेश्वर मनोज गावंडे, तालुकाध्यक्ष दर्यापूर अरविंद घाटे ,तालुका शहराध्यक्ष कपिल पोटे, तालुका उपाध्यक्ष नितीन गावंडे, शंतनु बोरेकर , विवेक खंडारे, प्रफुल सानप,मंगेश पोल्हाड,वंश गावंडे, शंतनू ठाकरे ,संकेत ठाकरे, ज्ञानेश्वर दहिकर ,निकेश वडाळकर, प्रतीक नाकट, अमोल दुधाट, आकाश चांदुरकर, सागर तायडे ,प्रणय हीवसे ,शिव कुंभलकर ,अंशू शेख, अनिकेत पवार ,अंकित राजगुरे, श्रेयश पेठे, सागर तायडे, सोहम मेश्राम, अनिकेत चतुर, विशाल सूर्यवंशी, रोहन पवार ,अजय भिलावेकर, स्वप्नील बारब्दे, राहुल जोशी, प्रतीक भोकरे, निखिल वडूजकर, तम्नय भुयार,अंकुश घारड,सचिन निर्मळ, इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleबाबासाहब आंबेडकर मराठवाडा विश्वविद्यालय नामांतरण दिवस पर शहिदों को नमन
Next articleकोव्हिशिल्ड लस मध्यरात्री नागपुरात दाखल, विभागातील 6 जिल्ह्यात वितरण
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).