Home मराठी Nagpur | राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Nagpur | राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

696

नागपूर ब्युरो : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त श्रीकांत फडके यांनी अभिवादन केले. उपायुक्त अंकुश केदार, तहसिलदार अरविंद सेलोकर, नायब तहसिलदार संदीप तडसे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालय

जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, सुजाता गंधे, मीनल कळसकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी अभिवादन केले.

समाजकल्याण विभाग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात राजमाता ‍जिजाऊ माँ साहेब व रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी अभिवादन केले. सहाय्यक संचालक रमेश कुमरे, सहाय्यक लेखाधिकारी सहारकर, दिनेश कोवे, सुखदेव कौरती यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी अभिवादन केले.