Home मराठी महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन

महाराष्ट्रात आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन

कोरोना व्हायरसवरील लसींच्या ड्राय रनचा दुसरा टप्पा आज (शुक्रवारी) देशात पार पडत आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीचं ड्राय रन पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज म्हणजेच 8 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जाणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला व्हेरीफिकेशन केलं जाईल. त्यानंतर तुम्ही जाऊन पोहोचाल प्रतिक्षा कक्षात पोचलं. ज्यावेळी आपला नंबर येईल त्यावेळी प्रत्यक्ष लसीकरण कक्षात प्रवेश मिळेल. तिथे लस दिल्यानंतर अर्धातास आपल्याला निरीक्षण कक्षात ठेवण्यात येणार आहे. आपल्याला लसीकरणाचा कुठलाही त्रास होतो का याचं निरीक्षण तिथे केलं जाईल. आज राज्यभरात ड्राय रन करण्यात येणार आहे.

नांदेड : शहरातील जंगमवाडी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शंकरराव चव्हाण सामान्य रुग्णालय, मिडखेड तालुक्यातील मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र अशा पाच ठिकाणी आज कोविडच्या लसीकरण्याची प्रात्यक्षिक पार पडणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील 75 लाभार्थींची निवड करण्यात आलेली आहे. सदर कोविड लसीकरण प्रात्यक्षिक अथवा ड्रायरन टेस्ट सकाळी साडेदहा वाजता सुरुवात केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here