Home मराठी Nagpur। छावणी परिसरात आग

Nagpur। छावणी परिसरात आग

565

नागपुरातील छावणी परिसरातील नागरी वस्तीत आग
अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे प्रयत्नांना यश

नागपूर ब्यूरो : नागपुरातील छावणी परिसरात असलेल्या एका नागरी वस्तीत सकाळी ११ च्या सुमारास आग लागली आहे. ज्या परिसरात ही आग लागली आहे तेथे अत्यंत दाट लोकवस्ती असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नागपुरातील पोलीस आयुक्त कार्यालय असलेल्या छावणी परिसरातील ही आग लागलेली नागरी वस्ती आहे. घटनास्थळावर आग विझविण्याचे बंब पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. आग लागल्यानंतर काही क्षणातच तेथील नागरिकांनी घटनास्थळापासून दुर अंतरावर आश्रयास गेले आहे. अद्याप तरी कोणत्याही प्रकारच्या जिवित हानीची माहिती मिळालेली नाही.दरम्यान ही आग आटोक्यात आली असल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी राजेन्द्र उचके यांनी सांगितले आहे. छावणी नजीकच्या या नागरी वस्तीत असलेल्या एका दुकानाला ही आग लागली होती. तर ज्या दुकानाला आग लागली होती त्यावर असलेल्या एका दुकानात फटाक्यांचा साठा असल्याचीही माहिती मिळाली आहे. मात्र वेळीच दखल घेतली गेल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्नांना यश आले आहे.

Previous articleअमेरिकी संसद में हुए हंगामे के दौरान 4 की मौत, वॉशिंगटन डीसी में इंमरजेंसी
Next articleMaharashtra | राज्यात बर्ड फ्लू नाही, सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू – सुनील केदार
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).