Home हिंदी बैठक : ‘कोविड रुग्णांसाठी मानकापूर येथे जम्बो हॉस्पिटल’ -डॉ.नितीन राऊत

बैठक : ‘कोविड रुग्णांसाठी मानकापूर येथे जम्बो हॉस्पिटल’ -डॉ.नितीन राऊत

655

नागपूर : विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे ‘जम्बो रुग्णालय’ मानकापूर येथे उभारण्यात येणार असून सुमारे एक हजार रुग्णांसाठी सुविधा येथे उपलब्ध होईल, अशी माहिती आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात नागपूर येथे ‘जम्बो कोविड हॉस्पिटल’साठी शहरातील योग्य जागा सुलभ होईल, यादृष्टीने राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

एएए हेल्थ कन्संटन्सी सर्विसेसचे डॉ. अहमद मेकलाई, डॉ. अमृता सूचक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा चिकीत्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. दीपक सेलोकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोवीड रुग्णांसाठी मुंबई तसेच पुणे येथे ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने नागपूर शहरात देखील एक हजार रुग्णांसाठी ‘जम्बो हॉस्पिटल’ची स्थापना करण्याच्या दृष्टीने राधास्वामी सत्संग (कळमेश्वर), शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांची डॉ. राऊत यांनी माहिती घेतली. मानकापूर स्टेडियम सर्व दृष्टीने सुलभ असल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले.

Previous articleThank you Users: ‘aatmnirbharkhabar.com’ visitors crossed 1000 in 10 days
Next articleवायरल : कार में बैठकर नेहा कक्कड़ ने डांस से मचाया तहलका
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).