Home मराठी Maharashtra | मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आता ‘सेगवे’

Maharashtra | मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आता ‘सेगवे’

652

मुंबई ब्यूरो : मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आता अत्याधुनिक सेगवे दाखल झाल्या आहेत. शनिवार, 2 डिसेंबर ला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अक्षय कुमार, मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हस्ते या सेगवेचे उद्घाटन करण्यात आले.

वरळी सी फेस आणि कार्टर रोड या दोन ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात पोलिसांना हे सेग्वे देण्यात आले. चौपाटीवर गस्त घालण्यासाठी पोलीस सायकल ऐवजी आता सेगवे वापरतील.

स्वसंतुलीत विद्युत स्कूटर म्हणजेच सेगवे प्रणाली मुंबई पोलिसांच्या गस्तीसाठी मदतगार ठरेल आणि यामुळे मुंबई पोलीस अधिक गतिमान होऊन आणखी जोमाने लोकाभिमुख कार्य करतील असा विश्वास यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी जून 2020 मध्येही मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे सेगवेचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी पन्नास सेगवेचे उद्घाटन करण्यात आले होते आणि त्यातील 10 सेगवे वरळीसाठी, 5 नरिमन पॉईंट परिसरासाठी तर वांद्रे, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे सेगवे देण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं होतं.

महाराष्ट्र पोलीस दल हे जागतिक पोलिसिंग स्टँडर्डनुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा साधन सामग्रीने भक्कम करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे. त्यानुसार या सेगवे चे उद्घाटन करण्यात आले आहे.