Home मराठी Chandrapur | नागभीडच्या मिंथुर गावचे हिमांशु महाजन राज्यात प्रथम

Chandrapur | नागभीडच्या मिंथुर गावचे हिमांशु महाजन राज्यात प्रथम

915

चंद्रपूर ब्यूरो : जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथुर या गावचे रहिवाशी हिमांशु मोरेश्वर महाजन ग्रेटर नोयडा येथील पुरातत्व विभागातर्फे घेन्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातुन प्रथम व देशातुन 12 व्या क्रमांकावर आले. त्यांच्या या यशामुळे प्रशिक्षण साठी त्यांची निवड झाली आहे.

हिमांशु मोरेश्वर महाजन याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठातुन याच विषयात पदवी प्राप्त केली आहे. देशभरातुन केवळ 15 जणांचीच यासाठी निवड झाली आहे. त्याचे वडील माजी पंचायत समिती सदस्य असुन, आई माजी सरपंच आहे. हिमांशु व त्याच्या आई वडीलांचे परीसरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.