Home मराठी Nagpur | प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजाविरोधात मनपाची कारवाई

Nagpur | प्लास्टिक पतंग, नॉयलॉन मांजाविरोधात मनपाची कारवाई

790

नागपूर ब्यूरो : संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजाविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. गुरुवारी (ता.31) दोन झोनमध्ये केलेल्या तिन कारवाईच्या माध्यमातून सुमारे तिन हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तानच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (ता.३१) धंतोली झोनअंतर्गत दोन, गांधीबाग झोनअंतर्गत एक कारवाई करण्यात आल्या. या माध्यमातून तिन हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 97 नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली.

Previous articleChandrapur | नागभीडच्या मिंथुर गावचे हिमांशु महाजन राज्यात प्रथम
Next articleNagpur | 107 नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).