Home हिंदी कोरोना काळात नोकरी गेली, पण एका लॉटरीमुळे नशीब उघडलं

कोरोना काळात नोकरी गेली, पण एका लॉटरीमुळे नशीब उघडलं

632

नवी दिल्ली ब्यूरो : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसनं सर्वच बाबतींत अडचणींचा डोंगर उभा केला. यामध्ये नोकऱ्या गमावलेल्यांची संख्या तुलनेनं जास्त. पण, त्यातूनही नोकरी गमावलेल्या एका तरुणाच्या नशीबाला अनपेक्षित कलाटणी मिळाल्याची घटना घडली आहे. ज्यामुळं सध्या याचीच खूप चर्चाही सुरु आहे.

नवनीत संजीवन असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव. तो मूळचा केरळचा आहे. तो अबूधाबीतील एका कंपनीत नोकरी करत होता. पण कोरोना काळात त्याला नोकरी गमवावी लागली. कंपनीवर आलेल्या आर्थिक संकटामुळं त्यालाही नोकरी सोडण्यास सांगण्यात आलं. सध्या नवनीत या कंपनीत नोटीस पीरिएडवर आहे.

सोबतच तो इतर ठिकाणी नोकरीच्या शोधातही आहे. काही ठिकाणी त्यानं मुलाखतीही दिल्या आहेत. नोकरीच्या फोनकॉलच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नवनीतला एके दिवशी असाच एक फोनकॉल आला आणि त्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. नवनीतला आलेला हा फोन होता दुबई ड्यूटी फ्रीचा. DDF Millennium Millionaire Draw प्रकारातील लॉटरीमध्ये त्याला तब्बल 1 मिलियन डॉ़लरची लॉटरी लागली आहे, असं या फोनकॉलमध्ये सांगण्यात आलं.

मूळचा केरळमधील कासारगोडचा असलेला नवनीत विवाहित असून तो पत्नी आणि लहानग्या मुलासह दुबईतच राहतो. त्यानं हे लॉटरीचं तिकीट 22 नोव्हेंबरला विकत घेतलं होतं. त्याची पत्नी अद्यापही दुबईमध्ये नोकरी करत असून, नवनीतही नोकरीच्या शोधात आहे. नोकरी न मिळाल्यास दुबईतून पुन्हा मायदेशी परतण्याच्या विचारात तो होता. आपल्यावर असणारं एक लाख दिरामचं कर्ज फेडण्यासाठीच तो प्रयत्न करत असल्याची माहिती त्यानं दिली.

डीडीएफ लॉटरी जिंकणारा नवनीत हा 171 वा भारतीय आहे. या लॉटरीच्या सोडतीमध्ये आजवर अनेक भारतीयांना बक्षिस घोषित झालं आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleNitin Raut | ‘गोरेवाडा’ विकासकामांच्या निधीसाठी प्रस्ताव पाठवा
Next articleCovid-19 | ब्रिटनमध्ये नवा प्रकार : राज्यात पुढील 15 दिवस अधिकची सतर्कता
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).