Home हिंदी Nagpur | नागपुरात मा. गो. वैद्य यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी

Nagpur | नागपुरात मा. गो. वैद्य यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी

772

नागपुर ब्यूरो : ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांचे शनिवारी दुपारी 3.30 वाजता नागपूर येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले. नागपुरात मा. गो. वैद्य यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी उसळली.

ज्येष्ठ विचारवंत व संपादक, हिंदुत्वाचे भाष्यकार, ‘तरुण भारत’चे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या पार्थिवावर अंबाझरी स्मशानभूमीत डिझेल शवदाहीनीत अंत्यसंस्कार करण्यात आला. मोठा मुलगा धनंजय याने अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडली. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्यासह वैद्य कुटुंबीयांचे आप्त व चाहते उपस्थित होते.

रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर 80, विद्याविहार, प्रतापनगर, येथून अंत्ययात्रा निघाली. अंबाझरी घाटावर दोन मिनिटे माैन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येत्या 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता रेशिमबाग येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अंत्ययात्रेपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सात्वंन केले. यावेळी बोलताना भागवत यांनी वैद्य यांच्या जाण्याने संघाचा शब्दकोश हरवल्याची भावना व्यक्त केली. ते संघ विचार जगले. सल्लामसलत करण्याचे ते हक्काचे स्थान होते. त्यांच्या जाण्याने आता काही विचारायचे ते कुठे, असा रिक्तपणा निर्माण झाला आहे. जीवन कसे जगावे याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले, अशी शोकसंवेदना भागवत यांनी व्यक्त केली. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी रात्री घरी जाऊन वैद्य कुटुंबीयांचे सात्वंन केलेे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).