Home हिंदी Buldhana | बुलडाण्यातील जवान कारगीलमध्ये शहीद, आज अंत्यसंस्कार

Buldhana | बुलडाण्यातील जवान कारगीलमध्ये शहीद, आज अंत्यसंस्कार

719

बुलडाणा ब्यूरो : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील जवान प्रदीप मांदळे हे कर्तव्यावर असताना काश्मीरमधील द्रास सेक्टरमध्ये गेल्या मंगळवारी हिमस्खलनात शहीद झाले. कारगील व द्रास भागातील भागातील हवामान खराब असल्याने त्यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यास उशीर झाला. त्यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असून बुलडाण्यातील पळसखेड चक्का येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का या छोट्याशा गावातील शहीद प्रदीप मांदळे हे महार रेजिमेंटमध्ये 2009 साली सैन्यात भरती झाले होते. गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व नंतर किनगाव राजा येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलंय. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी काही दिवस खाजगी कंपनीतही काम केलं. 2009 मध्ये सैन्यात दाखल झाल्यावर त्यांनी पुणे येथे व नंतर जम्मू काश्मीर मधील वेगवेगळ्या भागात देशसेवा केली.

त्यांच्या पश्चात त्यांच्या आई, पत्नी, तीन मुलं व भाऊ आहेत. त्यांच्या आई आजारी असल्याने त्या औरंगाबादच्या रुग्णालयात भरती आहेत. सध्या ते कारगील मधील द्रास सेक्टरमध्ये कर्तव्यावर होते. मंगळवारी द्रास भागात झालेल्या हिमस्खलनात काही सैनिक गस्तीवर असताना त्याखाली सापडले व त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या भागातील हवामान खराब असल्याने त्यांचा मृतदेह शोधून मूळगावी आणण्यास उशीर झाला. सकाळी त्यांचं पार्थिव औरंगाबाद येथून सकाळी पळसखेडा चक्काकडे घेऊन निघाले आहेत. आजच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleCM Uddhav Thackeray | आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार
Next articleTelangana | बाल अधिकार सदस्य ने की राचकोंडा पुलिस की सराहना
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).