Home हिंदी Krupal Tumane | शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारले

Krupal Tumane | शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारले

918

नागपूर ब्यूरो : पदवीधर असो किंवा शिक्षक असो ते जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत, त्यामुळे यात जनसामान्य जनतेने सहभाग नोंदविला. त्यांनी वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला या विधान परिषदेच्या या निवडणुकीतून जनतेने स्वीकारले आहे हे स्पष्ट झाले आहे. सरकार स्थापनेनंतर संकटाचा सामना सरकारला करावा लागला. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारने उत्तम कामगिरी केली आहे. महाविकास आघाडीवरील जनतेचा विश्वास व केलेल्या कामांची पावती या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने दिली आहे. शिवसेनेची ताकद या निवडणुकीतून सिद्ध झाली आहे, असे मत रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी नोंदविले.

नागपूर पदवीधर मतदार संघात विजयी झालेले अभिजित वंजारी यांचे अभिनंदन खासदार कृपाल तुमाने यांनी केले. नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यात शिवसेना कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवाराचा प्रचार केला. निवडणुकीसाठी शिवसेनेने केलेली पूर्व तयारी कामात आली. रामटेक मतदार संघात झालेले रेकॉर्ड मतदान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्नाचे फळ आहे.

अभिजित वंजारी यांच्या प्रचार सभेत शिवसेना पदाधिकारी यांनी स्वत: हजेरी लावली व कॉंग्रेसचा हात मजबूत केला. हा विजय कॉंग्रेस उमेदवाराचा असला तरी शिवसेना व राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करायलाच हवे, आगामी काळात महाविकास आघाडी सर्व निवडणुका एकत्रित लढल्यास विजय निश्चित होईल, असा विश्वासही खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleUddhav Thackeray | आज समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करणार
Next articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).