Home हिंदी Uddhav Thackeray | आज समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करणार

Uddhav Thackeray | आज समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करणार

692

मुंबई/ नागपूर ब्यूरो : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी ते बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करतील. याशिवाय, मुख्यमंत्री दोन्ही जिल्ह्यातील इतर महामार्गाच्या कामांचाही आढावा घेतील. या दौऱ्यात ते अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या कामांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत

असा असले मुख्यमंत्रांचा दौरा
  • सकाळी 10.20 वाजता मुख्यमंत्री मुंबईहून विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर पोहोचतील.
  • हेलिकॉप्टरमधून ते अमरावती जिल्ह्यातील नांदगाव-खांदेश्वर येथील शिवणी रसुलापूर, मौजे देऊळगव्हाण येथे पोहोचतील
  • 11.15 वाजता मोटारीने ते हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी करतील
  • दुपारी 12.15 वाजता ते हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवडीकडे निघतील.
  • दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री गोळवडी हेलिपॅड येथे पोहोचतील, त्यानंतर मोटारीने हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करतील.
  • दुपारी 3.10 वाजता ते हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे निघतील. औरंगाबाद येथे पोहोचतील त्यानंतर ते 3.35 वाजता विमानतळावरुन मुंबईकडे निघतील

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. एकूण 710 किलोमीटरच्या या द्रुतगती महामार्गासाठी जवळपास 56 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे मुंबई-नागपूर हा प्रवास अवघ्या सहा तासांत करणे शक्य होणार आहे.

120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांतील आणि 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे 60 टक्के काम पूर्ण झाले होते. जिल्ह्यातील फतियाबाद ते वैजापूर तालुक्यातील सुराळ्यापर्यंत 60 टक्के महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे.