Home हिंदी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन | नागपूर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांची सायकलवारी

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन | नागपूर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांची सायकलवारी

412
0

दर वर्षी 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नागपूर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सायकलवारी केली.

 

नागपूर ब्यूरो : राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त (National Pollution Control Day 2020) नागपूर महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सायकलवरुन महापालिकेत पोहोचले.

वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना हा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर सायकल चालवणं आरोग्यसाठीही उत्तम असल्यानं त्यांनी हा पर्याय निवडला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, जलज शर्मा, संजय निपाने यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हे सर्व अधिकारी सकाळी 9.30 वा. आकाशवाणी चौकात एकत्र आले आणि त्यांनी सायकलवर महापालिका गाठली.

प्रत्येक वर्षी 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. प्रदूषणामुळे होणाऱ्या परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले होते. भोपाळच्या युनियक कार्बाइड प्लँटमधून मिथेल आयसोसायनेट गॅसची गळती होऊन ही दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या आठवणीत भारतात हा दिवस साजरा केला जातो.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here