Home हिंदी पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी, अंतिम निकालास उशीर होणार

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी, अंतिम निकालास उशीर होणार

694

मुंबई ब्यूरो : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढले. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणूक पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजेपासून सुरु झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या निवडणुकीचा अंतिम निकाल यायला वेळ लागण्याची शक्यता आहे.

पुणे पदवीधरमध्ये भाजपकडून संग्रामसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि अपक्ष श्रीमंत कोकाटे यांच्यात प्रमुख लढत झाली. या ठिकाणी मनसेच्या रुपाली पाटील देखील मैदानात आहेत. तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत झाली. याठिकाणी विदर्भाच्या मुद्द्यावर नितिन रोंघे यांनी खुप प्रचार केला.

तर पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपचे जितेंद्र पवार आणि अपक्ष म्हणून मैदानात असलेले दत्तात्रय सावंत यांच्यात प्रमुख लढत झाली. तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यात लढत झाली.

महाविकास आघाडीचे उमेदवार

महाविकास आघाडीकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 5 उमेदवार मैदानात आहेत. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 तर शिवसेनेचा 1 उमेदवार रिंगणात आहे.

  1. अमरावती शिक्षक मतदारसंघ – श्रीकांत देशपांडे, शिवसेना
  2. पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस
  3. पुणे शिक्षक मतदारसंघ – प्रा. जयंत आसगांवकर, काँग्रेस
  4. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस
  5. नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजीत वंजारी, काँग्रेस
भाजपचे उमेदवार

तर भाजपनेही महाविकास आघाडीविरोधात उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न दिल्याने रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे.

  1. अमरावती शिक्षक मतदारसंघ – डॉ. नितीन धांडे
  2. पुणे पदवीधर मतदारसंघ – संग्राम देशमुख
  3. पुणे शिक्षक मतदारसंघ – जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत अपक्ष)
  4. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – शिरीष बोरनाळकर
  5. नागपूर पदवीधर मतदारसंघ – संदीप जोशी

धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज

धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल देखील आज लागणार आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली आहे. अमरिश पटेल यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबरला राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता.

मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यानं केवळ 12 महिन्यांचा कालावधी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा या निवडणुकीत भाजपला फायदा होणार कि महाविकास आघाडी सरकारला फायदा होणार हे आज कळणार आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleमेट्रो स्टेशन | ई – फिडर सेवा मध्ये होत आहे वाढ
Next articleराष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन | नागपूर मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांची सायकलवारी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).