Home हिंदी मेट्रो स्टेशन | ई – फिडर सेवा मध्ये होत आहे वाढ

मेट्रो स्टेशन | ई – फिडर सेवा मध्ये होत आहे वाढ

664

एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते एयरपोर्ट पर्यंत निशुल्क सेवेचा नागरिक करीत आहे वापर

नागपूर ब्यूरो : महा मेट्रोने प्रदूषणमुक्त आणि वाहतुकीला सुलभ अशी ई – स्कुटर प्रणाली सेवा प्रवाश्यान करता मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध करून दिली असून या ई- स्कुटर प्रणाली मध्ये वाढ देखील होत आहे. एयरपोर्ट साऊथ,एयरपोर्ट, जेपी नगर व रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन येथे आता एकूण 30 ई- बाईक व ई- स्कुटर्स उपलब्ध झाले आहेत. दिनांक 29 ऑक्टोबर पासून महा मेट्रोच्या एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथून ही सेवा सुरु झाली आहे.

महा मेट्रोने केएचएस असोसिएटस,नागपूर या कंपनी सोबत सामंजस्य करार केला असून या कंपनीच्या स्विच नावाच्या ई-फिडर सेवा नागरिकांन करता उपलब्ध आहेत ज्यामध्ये लो -स्पीड टू -व्हीलर, ई – रिक्षा , ई – सायकल व चार्जिंग स्टेशनचा समावेश आहे. तसेच प्रवाश्यान करिता एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते एयरपोर्ट येथे जाणाऱ्या प्रवाश्यान करीता निशुल्क सेवा देण्याचे योजिले असून मोठ्या प्रमाणात नागरिक यांचा उपयोग करीत आहे.ही सेवा सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 5 ते 10 पर्यंत उपलब्ध आहे व इतर वेळेमध्ये 10 रु. प्रति व्यक्ती किराया आकारण्यात येत आहे.

या व्यतिरिक्त खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी व लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व जवळपासच्या परिसरात जाण्याकरिता फिडर सर्विसच्या रूपात आपली बस सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे. मल्टी मॉडेल इंटीग्रेशन अंतर्गत फस्ट टू लास्ट माईल कनेटीव्हीटी नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट अशी संकल्पना असून याद्वारे प्रत्येक प्रवाशाला स्टेशनवरून वाहतुकीची सुलभ यंत्रणा उपलब्ध होत आहे.

नागरिकांनी जास्तीत जास्ती मेट्रो सेवेचा वापर करावा या दृष्टीने महा मेट्रोच्या वतीने अनोख्या योजिण्यात आल्या असून त्या अमलात आणल्या जात आहे. नागरिकांनी स्वतःच्या वाहनांचा वापर न करता मेट्रो सेवेचा उपयोग करावा हा या मागील मुख्य उद्दिष्ये आहे. महा मेट्रो सर्व मेट्रो स्टेशन सर्व सोई – सुविधायुक्त असून या ठिकाणी पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिक मेट्रो स्टेशन येथे आपले वाहन पार्क करून मेट्रोने प्रवास करू शकेल ज्यामुळे इंधनची बचत होईल व प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.


रीडर्स आप आत्मनिर्भर खबर डॉट कॉम को ट्वीटर, इंस्टाग्राम और फेसबुक पर फॉलो कर रहे हैं ना? …. अबतक ज्वाइन नहीं किया है तो अभी क्लीक कीजिये (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020) और पाते रहिये हमारे अपडेट्स.