Home हिंदी डॉ. शीतल आमटे | आत्महत्येचे गूढ कायम; सीसीटीव्ही फुटेज, लॅपटॉप ताब्यात

डॉ. शीतल आमटे | आत्महत्येचे गूढ कायम; सीसीटीव्ही फुटेज, लॅपटॉप ताब्यात

751

मंगळवारी पोलिसांनी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या वापरातील लॅपटॉप, मोबाईल, घर आणि कार्यालयातील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सध्या पोलिस प्रशासन याप्रकरणात कमालीची गुप्तता पाळून आहे. मात्र सर्वांचे लक्ष या घटणेकडे लागलेले आहे.

चंद्रपूर ब्यूरो : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांना आनंदवनातील स्मृतिवनाजवळ सोमवारी रात्री दफन करण्यात आले.

मंगळवारी पोलिसांनी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या वापरातील लॅपटॉप, मोबाईल, घर आणि कार्यालयातील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सध्या पोलिस प्रशासन याप्रकरणात कमालीची गुप्तता पाळून आहे.

डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी सोमवारी (ता. 30) विषाचे इंजेक्‍शन टोचून आत्महत्या केली. या घटनेमुळे सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. हायप्रोफाईल प्रकरण असल्याने पोलिसांनीही मोठी गुप्तता पाळून चौकशीला सुरुवात केली आहे. रात्री उशिरा कुटुंबीयांच्या उपस्थितीत दफनविधी पार पडला. यावेळी वडील डॉ. विकास आमटे, आई डॉ. भारती आमटे, भाऊ डॉ. कौस्तुभ आमटे, पती गौतम करजगी, मुलगा शरविल, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, पल्लवी आमटे यांची उपस्थिती होती.

जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी मंगळवारी आनंदवनाला भेट देऊन चौकशी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे, पोलिस निरीक्षक खोब्रागडे उपस्थित होते. घर, कार्यालयातील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज आणि डॉ. शीतल आमटे वापरत असलेले लॅपटॉप, मोबाईल, कपडे ताब्यात घेतले.

आनंदवनातील नागरिकांचे बयाण नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. फॉरेन्सिंगच्या तीन सदस्यीय चमूने कालच घटनास्थळाला भेट देऊन चौकशी केली होती. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. आत्महत्येचे गूढ अजूनही कायम असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी भेट देऊन आमटे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

दोन दिवसांवर मुलाचा वाढदिवस

डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा शरविल हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचा शुक्रवारी वाढदिवस आहे. डॉ. शीतल या दरवर्षी वृक्षारोपण करून मुलाचा वाढदिवस साजरा करीत होत्या. मात्र, वाढदिवसाच्या तीन दिवसांआधीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेने शरविलला मोठा धक्का बसला आहे. दफनविधीच्या वेळेत शरविलने हंबरडा फोडताच सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. सर्व वातावरण भावुक झाले होते.

पोलिसांकडून मोठी गुप्तता

आमटे कुटुंबीय मोठे प्रस्थ आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्य, देशभरात या कुटुंबीयांचा मोठा चाहता वर्ग आहे. या कुटुंबात आत्महत्येची घटना घडल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली. मात्र, ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याची चर्चा सुरू आहे. परंतु, पोलिस विभागाकडून मोठी गुप्तता पाळत तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिस अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही.

कुटुंबीयांना मोठा धक्का

आत्महत्येची घटना धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. या घटनेमुळे आमटे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सध्या काहीही सांगण्याची मनःस्थिती नाही.
– डॉ. दिगंत प्रकाश आमटे, चुलतभाऊ


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleMaharashtra | शेतकरी संघटनांचा 3 डिसेंबर रोजी राज्यव्यापी एल्गार
Next article2020 में हमने क्या सीखा | विश्व सिंधी सेवा संगम की अनूठी प्रतियोगिता
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).