Home हिंदी अग्रवाल परिवारास जंगल सफारी करणे जिवावर बेतले

अग्रवाल परिवारास जंगल सफारी करणे जिवावर बेतले

870

12 वर्षीय मुलीचा अपघातात जागीच मृत्यू तर 40 वर्षीय काकाचा नागपूर नेताना वाटेत मृत्यू

चिमूर ब्यूरो : मंगलवार, 01/12/2020 ला नागपूर वरून ताडोबा अभयारण्यातील कोलारा जवळील देवरी येथील वन्य विलास या रिसॉर्ट मध्ये ऑनलाईन बुकिंग करून ताडोबा जंगल सफारी करीता जात असतांना सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी चिमूर जवळील बांबू रिसॉर्ट पासून 500 मिटर अंतरावरील तुकुम चा भडगा नाला मध्ये फोर्ड ची एन्डोव्हर कार (MH 49 KB 2489) एस आकाराचे वळण मार्ग असल्याने नव्याने रोडचे काम सुरू असून वाहनवरून नियंत्रण सुटले व कार नाल्यात पलटी मारल्याने मुलगी श्रेया अभिषेक अग्रवाल वय 13 वर्षे जागीच मरण पावली व दुसरे तिचे काका अमिनेश अशोक अग्रवाल वय 39 वर्षे यांना नागपूर येथे अँबूलन्सने उपचाराकरिता नेताना उमरेड जवळ वाटेत मृत्यू झाले.

या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय 38 वर्षे सह मिनू अमिनेश अग्रवाल 32 वर्षे , नेहा आशिष अग्रवाल वय 36 वर्षे , ईशु अनिमेश अग्रवाल वय 17 वर्षे असे एकूण 6 जण होते. या सहा पैकी 2 जनांचे मृत्यू झाले असून 4 जणांवर उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleनागपूर विभागात चार वाजेपर्यंत 53.64 टक्के मतदान
Next articleMaharashtra | फडणवीस सरकार की ‘जलयुक्त शिवार’ की जांच के आदेश
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).