Home हिंदी Gadchiroli | नक्षलवाद्यांनी अडविली एसटी ची बस

Gadchiroli | नक्षलवाद्यांनी अडविली एसटी ची बस

444
0

गडचिरोली ब्यूरो : येथील परिवहन महामंडळाच्या आगारातून सुटलेली बस नक्षल्यांनी बुधवार, 25 नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास रस्त्यावर झाडे आडवी टाकून अडविली होती.

बुधवार, 25 नोव्हेंबरला दुपारी 2.30 वाजता गडचिरोली येथील आगारातून एमएच 40-एक्यू 6038 क्रमांकाची बस भामरागड तालुक्यातील लाहेरी गावाकडे जाण्यास निघाली. रात्री 8 वाजताच्या सुमारास भामरागड-लाहेरी मार्गावर नक्षल्यांनी झाडे तोडून आडवी टाकली होती. शिवाय बॅनरही बांधले होते. त्यामुळे बस पुढे नेता आली नाही. परिणामी बसच्या चालक व वाहकाने बसमध्येच रात्र जागून काढली. बसमध्ये तीन प्रवासी होते. ते लाहेरी परिसरातीलच असल्याने पायी निघून गेले. गुरुवारी सकाळी पोलिसांनी रस्त्यावरील झाडे बाजूला केली असून, सकाळी बस धोडराज पोलिस ठाण्यात आणण्यात आली. बसचे चालक व वाहक सुरक्षित असल्याची माहिती गडचिरोलीचे आगारप्रमुख मंगेश पांडे यांनी ‘आत्मनिर्भर खबर डॉट कॉम’ ला दिली.

नक्षल्यांनी बांधलेल्या बॅनरवर 26 नोव्हेंबरचा देशव्यापी संप यशस्वी करण्याविषयीचा मजकूर लिहिला आहे. येत्या 2 डिसेंबरपासून नक्षल्यांच्या पीपल्स गुर्रिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह आहे. या सप्ताहात नक्षली हिंसक कारवाया करतात. मात्र, त्याआधीच त्यांनी बस अडविल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here