Home हिंदी जयंत पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटीलांनी जरा जपुन बोलावे

जयंत पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटीलांनी जरा जपुन बोलावे

796

रायुकां प्रदेश कार्यकारिणी सदस्य फैजान मिर्ज़ा यांचा सल्ला

नागपूर ब्यूरो : चंद्रकांत दादा पाटील यांनी कोणाचेही वर टीका करताना जरा संस्कृती आणि सभ्यता राखावी. कारण इथे कोणाला फुकट काय मिळाले आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला चांगले माहीत आहे. भाजपातील काही नेत्यांनाही हे माहीत आहे म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्यावर टिका करताना चंद्रकांत दादांनी जरा जपुन बोलायला हव, असग सल्ला रायुकां प्रदेश कार्यकारिणी सदस्य फैजान मिर्ज़ा यांनी दिला आहे.

फैजान मिर्ज़ा म्हणतात, चंद्रकांत दादांनी हे समजायला हव की जयंत पाटील मागील तीस वर्षा पासून लोकनियुक्त आमदार आहेत. या तुलनेत चंद्रकांत पाटील फक्त 2019 मध्ये लोकनियुक्त आमदार झाले.

जयंत पाटलांशी बरोबरी अशक्य
महाराष्ट्र मध्ये 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राकां चे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटील यांनी योग्य प्रकारे सांभाळली. फैजान मिर्ज़ा यांनी असाही सल्ला दिला आहे की जयंत पाटील यांच्या कडून शिकवण घेऊन चंद्रकांत दादांनी आपल्या पक्षाला सांभाळावं. सोबतच मिर्ज़ा म्हणतात की महाविकास आघाडी सरकार प्रमाणिकपणे कल्याणकारी काम करत आहे. या कल्याणकारी कामात चंद्रकांत पाटील यांनी अडथळा आणू नये.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).