Home हिंदी Diwali | अमरावतीत 24 कॅरेट सोन्याची खास मिठाई ‘सोनेरी भोग’

Diwali | अमरावतीत 24 कॅरेट सोन्याची खास मिठाई ‘सोनेरी भोग’

793

अमरावती ब्यूरो : दिवाळी निमित्त बाजारात हटके आकाश कंदील, पणत्या आणि फराळ यांची आवाक वाढली आहे. अशातच महाराष्ट्र राज्याच्या अमरावतीतील एका मिठाईच्या दुकानात दिवाळीसाठी एक हटके मिठाई तयार करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे, ही मिठाई सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. हिला नाव देण्यात आले आहे, “सोनेरी भोग”.

दिवाळी निमित्त अमरावतीच्या नामांकित रघुवीर मिठाई यांनी यावर्षी तब्बल सात हजार रुपये किलो भावाची शुद्ध सोनेरी वर्ख असलेली ‘सोनेरी भोग’ ही मिठाई बाजारात आणली आहे. विदर्भातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांकरिता ‘सोनेरी भोग’ उपलब्ध करून दिली जाणार आहे. पिस्ता, केसर आणि हेझलनट या ड्रायफ्रुट्सपासून ही मिठाई तयार करण्यात आली असून या मिठाईवर खास दिल्लीतील नोएडा येथून मागवलेला सोन्याचा 24 कॅरेट सर्टिफिकेटसह वर्ख लावलेला आहे. तसेच मिठाई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 24 कॅरेट सोन्याच्या वर्खाचं सर्टिफिकेटही दिलं जाणार आहे.

राजस्थानमधील कारागिरांनी ‘सोनेरी भोग’ ही विशेष मिठाई खास दिवाळीसाठी तयार केली आहे. शुद्ध सोन्याचा वर्ख असलेल्या या मिठाईची किंमत 7000 रुपये प्रति किलो इतकी असून अमरावतीच्या राजापेठ येथील प्रतिष्ठानात ही मिठाई विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आली आहे.

शुद्ध 24 कॅरेट गुणवत्ता प्रमाणपत्रासह बनविलेली ही मिठाई ग्राहकांना आकर्षित करीत आहे. दरवर्षी दीपावली सणानिमित्त हा स्वीट मार्ट आपल्या ग्राहकांना नवीन मिठाई उपलब्ध करुन देत असतं. यापूर्वी गोल्डन बिस्किट, सोनेरी पॅन आणि आता सोनेरी भोग या मिठाई ग्राहकांची दिवाळी खास करणार आहेत. सुमारे 7 हजार रुपयांच्या या गोड वस्तूच्या प्रत्येक बॉक्ससह 24 कॅरेटच्या सोन्याचं प्रमाणपत्रही ग्राहकांना देण्यात येत आहे. मार्टचे संचालक चंद्रकांत पोपट यांच्या म्हणण्यानुसार, सोन्याची मिठाई बदाम, शुद्ध केशर, शुद्ध पिस्ता, शुद्ध हेझलनट यापासून बनवल्या आहेत. ही गोड मिठाई ग्राहकांना आकर्षित करते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleBirthday | धूमधाम से मनाया जन्मदिन, पार्टी में शामिल हुए 15 हाथी
Next articleElection | संदीप जोशी ने लिया गडकरी का आशीर्वाद
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).