Home हिंदी Appointment | चंद्रशेखर बावनकुळेंवर पुन्हा जबाबदारी

Appointment | चंद्रशेखर बावनकुळेंवर पुन्हा जबाबदारी

588

पदवीधर निवडणूक : निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती

नागपूर ब्यूरो : लवकरच होत असलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि प्रदेश भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने पुन्हा जबाबदारी सोपविली आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभाग निवडणूक प्रमुख म्हणून बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. पदवीधर निवडणुकीत बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपाला दणदणीत यश मिळेल, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सातत्याने निवडून येत आहेत. हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस यांच्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदार संघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले आहे. अनिल सोले या मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत.

महाराष्ट्र राज्यात भाजपाचे सरकार नाही. सत्तारूढ महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे यावेळी ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोपविलेल्या या जबाबदारीचे महत्त्व वाढले आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleOnline Exam | पेड़ की छाव में बैठकर छात्रा ने दिया इम्तिहान
Next articleElection | संदीप जोशी को भाजपा ने बनाया विप चुनाव में अपना प्रत्याशी
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).