Home हिंदी जयंती विशेष | पुलंना गुगलची मानवंदना, बनवलं खास डूडल

जयंती विशेष | पुलंना गुगलची मानवंदना, बनवलं खास डूडल

736

पुणे ब्युरो : पु.ल. देशपांडे यांच्या नावाशिवाय मराठी साहित्य क्षेत्र पुर्ण होऊ शकत नाही. साहित्य, चित्रपट, संगीत, अभिनय, नाटक, समाजसेवा अशा क्षेत्रांत योगदान दिलेल्या पुलंच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची दखल आता गूगलने घेतली आहे. पुलंच्या 101व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल बनवलं आहे. ‘गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ या विभागात पु ल देशपांडे यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला आहे.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल.देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल अशा नावाने जनमाणसात पोहोच असलेलं एक भन्नाट व्यक्तिमत्व. लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा कित्येक भूमिका त्यांनी बजावल्या. हजरजबाबीपणा ही त्यांची खास ओळख. त्यातून आलेले अनेक किस्से आजही चर्चेत असतात. पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से प्रसिद्ध देखील आहेत.

आज पुलंचा 101वा जन्मदिन आहे. या निमित्ताने गूगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर विभागातील पुलंविषयीचे खास दालन खुले करण्यात आले आहे. या डूडलमुळे पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आता जागतिक स्तरावर पोहोचले आहे. गूगलने केलेल्या दालनामध्ये पुलंच्या बहुआयामी योगदानाचा वेध घेण्यात आला आहे.

मुंबईत राहणाऱ्या समीर कुलावूर या कलाकाराने हे खास डुडल तयार केले आहे. पु ल देशपांडे यांच्या जीवनकार्याची संपूर्ण माहिती या डूडलच्या निमित्ताने मिळत आहे. या डूडलमध्ये पुलं हे हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या मागे त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी विविध रंगांची उधळणही केल्याचं दिसत आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).