Home हिंदी ना. नितीन गडकरी यांचे प्रयत्नाने दीक्षाभूमी स्तुपाच्या विकासाचा मार्ग झाला मोकळा

ना. नितीन गडकरी यांचे प्रयत्नाने दीक्षाभूमी स्तुपाच्या विकासाचा मार्ग झाला मोकळा

427

भाजपा नेत्यांनी मानले गडकरी यांचे आभार

नागपूर ब्यूरो : केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे निर्देशान्वये उर्वरित निधी मिळाल्याने दीक्षाभूमी स्तुपाच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्याप्रित्यर्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले आणि शॅाल – पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या दीक्षाभूमी स्तूपाचे नुतनीकरण, रखरखाव तसेच परिसरातील इतर विकासकामांकरिता केंद्र शासनाच्या डॅा. आंबेडकर फाऊंडेशन ने सुमारे साडेनऊ कोटी रूपयांच्या निधीस जाने. 2016 मध्ये मान्यता देवून त्यापैकी 4 कोटी 70 लाख 69 हजाराचा निधी त्याच वर्षात नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुपुर्द करण्यात आला. असे असतांना, नोडल एजंसी ने प्रत्यक्षात जून, 2018 ला कामाचे कार्यादेश जारी केलेत. फेब्रुवारी 2020 च्या दुसऱ्या आठवडयात फाउंडेशन चे उपाध्यक्ष अशोक मेंढे यांनी दिक्षाभूमी ला भेट देवून कामाची पाहणी केली. तेव्हा उर्वरित निधी मिळावा, म्हणून NMRDA ने त्यांचे लक्ष वेधले. पण अश्यातच उदभवलेल्या कोरोना महामारीमुळे शासकीय कामे प्रभावित झालीत. कोविड वर नियंत्रण , जनतेचा बचाव व सुरक्षा कामास शासन-प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. तरीही यातून प्रशासनास थोडी उसंत मिळताच दीक्षाभूमी बाबत असलेल्या आस्थेपोटी ज्येष्ठ केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घातल्याने उर्वरित निधी हा NMRDA च्या खात्यात नुकताच वर्ग करण्यात आले. त्याकरीता आज, भारतीय जनता पार्टीच्या वतीने नामदार नितीन गडकरी यांचे आभार मानण्यात आले.

याप्रसंगी, डॅा. आंबेडकर फाऊंडेशन चे उपाध्यक्ष अशोकराव मेंढे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम, मनपा सत्ता पक्ष नेते संदीप जाधव, जिल्हा भाजप अध्यक्ष अरविंद गजभिये, अनु. जाती मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी, मोर्चा प्रदेश सचिव सतीश शिरसवान, मोर्चा शहराध्यक्ष राजेश हाथीबेड, मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबादास उके, शहर मंत्री ॲड. राहूल झांबरे, नगरसेवक नागेश सहारे प्रामुख्याने उपस्थित होते.