Home हिंदी कॊरोना काळातील प्रलंबित महसुली कामाना गती दयावी : बाळासाहेब थोरात

कॊरोना काळातील प्रलंबित महसुली कामाना गती दयावी : बाळासाहेब थोरात

663

नागपूर ब्यूरो : कॊरोनाच्या जागतिक प्रकोपा मुळे दैनंदिन जीवनासह शासकीय कामकाज ही मधल्या काळात प्रभावित झाले. मात्र आता कॊरोना बऱ्यापैकी नियंत्रनात असून कॊरोना काळातील प्रलंबित महसुली कामाना गती देण्याचे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. बैठकीला पालकमंत्री डॉ.नितीन राऊत,विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी नागपूर विभागातील कॊरोनाच्या सद्यस्थितीची माहिती थोरात यांनी जाणून घेतली. विभागातच नव्हे तर राज्यातील कॊरोना संसर्गाचा वेग व मृत्यू कमी झाले आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही.तर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.त्या दृष्टीने आरोग्ययंत्रणेसोबतच प्रशासनाने सतर्क असावे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी देखील कोरोनाच्या संभाव्य लाटेस तोंड देण्यासाठी आरोग्य व्यवस्था सज्ज असल्याचे सांगितले.

विभागातील पीक पाणी, पूर परिस्थितीचे निधी वाटप,झुडपी जंगलाविषयी ही माहिती घेतली. नागपूर विभागातील सातबारा संगणकीकरण 99 टक्के पूर्ण झाले ही समाधानाची बाब आहे,मात्र जमीन अकृषी करण्याची नियमावली सोपी करण्याबाबत महसूल विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दयाव्यात. वाळू लिलाव,प्रलंबित फेरफार नोंदी,महाराजस्व अभियानात केलेली काम,राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन मोबदला,आदींबाबत ही अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. बैठकीला उपायुक्त महसूल सुधाकर तेलंग,उपायुक्त मिलिंद साळवे,निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची,उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके,अविनाश कातडे,रवींद्र कुंभारे उपस्थित होते.

Previous articleआमदार गिरीश व्यास यांनी शासकीय रूग्णालय व दंत महाविद्यालय येथे वितरीत केल्या पीपीई कीट
Next articleचीफ जस्टिस बोबडे बोले- “आपकी कारें भी करती हैं ज्यादा प्रदूषण”
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).