Home हिंदी आमदार गिरीश व्यास यांनी शासकीय रूग्णालय व दंत महाविद्यालय येथे वितरीत केल्या...

आमदार गिरीश व्यास यांनी शासकीय रूग्णालय व दंत महाविद्यालय येथे वितरीत केल्या पीपीई कीट

717

नागपुर ब्यूरो : संपूर्ण जगात कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे महामारीचे संकट निर्माण झालेले असून अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा सुध्दा अपूरी पडत आहे. आशिया खंडात आकाराने सर्वात मोठे आणि मध्य भारतातील सर्वसामान्याचे आधार स्तंभ असलेल्या नागपूर शहरातील मेडीकल रूग्णालयातील कोरोना योद्धांना कोरोनाचा सामना करणे शक्य व्हावे म्हणुन व रूग्णांना पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या या करीता ‘बाहुबली क्लाथिंग कंपनी’ यांचे द्वारा निर्मीत वैद्यकीय साहित्य मा. आ. गिरीश व्यास यांनी आपल्या स्थानीक विकास निधी अंतर्गत 10 लक्ष रूपयाचे वैद्यकीय साहित्य आज बुधवार 30 ऑक्टोबर ला दुपारी 12 वा. शासकीय रूग्णालय व महाविद्यालय, नागपूर येथे पुन्हा वितरीत करण्यात आल्या.

या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य, पद्मश्री, खासदार डाॅ. विकास महात्मे, भाजपा नागपूर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके , आमदार अनिल सोले, आमदार मोहन मते, आमदार नागोगाणार, आ.  विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, मेडीकलचे अधिष्ठाता डाॅ. सजल मित्रा, डाॅ. मंगेश पघडनीक (डेंटल अधिष्ठाता), डाॅ. दिनेश कुंभलकर, डाॅ. बी. गुप्ता, डाॅ. अविनाश गावंडे, डाॅ. के. पी. वानखेडे, डाॅ. फौजाल, डाॅ. मुखर्जी, डाॅ. गुप्ता), भाजपा दक्षिण नागपूर अध्यक्ष देवेन दसतुरे, रमेष दलाल, किशोर पाटील, राकेश गांधी, विजय फडणवीस, विनय जैन, महिपाल सेठी, पवन तिवारी, धर्मेंद दुबे व अन्य मान्यवर उपस्थित होते.