Home हिंदी मनीष नगर आरओबी चे कार्य गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करा: डॉ. ब्रिजेश...

मनीष नगर आरओबी चे कार्य गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण करा: डॉ. ब्रिजेश दिक्षित

731

आरओबी येथील बौस्टिंग स्टील गर्डर व डाबरीकरण रस्त्यांची केली पाहणी

नागपूर ब्यूरो : वर्धा मार्गावरील डबल डेकर उडाणपूलाचे निर्माण कार्य अंतिम टप्यात असून नुकतेच मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर लाँचिंगचे कार्य महा मेट्रोने यशस्वीपणे पूर्ण केल्या नंतर या ठिकाणी डांबरीकरनाचे कार्य सुरु आहे. याच अनुषंगाने गुरुवारी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षित यांनी मनीष नगर आरओबीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान डॉ. दीक्षित यांनी मनीष नगर आरओबी येथे सुरु असलेले विद्युतीकरण तसेच डांबरीकरन कार्याचा आढावा त्यांनी अधिकाऱ्याकडून घेतला तसेच गुणवत्तापूर्ण कार्य जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून सदर उडाणपूल व आरओबी व आरयुबी नागरिकांकरिता खुला करण्यात येईल.

याशिवाय डॉ. दीक्षित यांनी वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपूलाची प्रत्यक्ष पाहणी करत केलेल्या कार्याची प्रशंसा केली, डबल डेकर उड्डाणपूलाचे रंगरंगोटीचे कार्य, दिशादर्शक सूचना फलक व विद्युतीकरणाचे कार्य अंतिम टप्यात या ठिकाणी सुरु आहे. तसेच मनीष नगर परिसरातून आरओबीला जोडणाऱ्या रस्त्याची योग्य ती खबरदारी घेऊन त्या ठिकाणचे कार्य देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्याना दिल्या.

3.14 किमी पुलासाठी 301 कोटी आणि आरयुबी व आरओबीच्या बांधकामासाठी 91 कोटी खर्च आला आहे. डबलडेकर उड्डाणपुलाचे बांधकाम महा मेट्रोने पूर्ण केले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खर्च केला आहे. या त्रिस्तरीय पुलाच्या रचनेत सर्वात खाली अतिस्त्वातील रस्ता, वर डबलडेकर आणि त्यावर मेट्रो रेल्वे धावणार आहे.

एकाच पिलरवर तीन मजली वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. अजनी मेट्रो स्टेशनपासून हा दुमजली उड्डाणपूल सुरु होत असून विमानतळ चौकात त्यांचे लैंडींग आहे. उड्डाणपुलाच्या मध्यभाग उज्ज्वल नगर येथून मनीषनगरकडे जाणारा उड्डाणपूल (आरओबी) व त्याच्याच खाली उज्ज्वलनगर ते मनीषनगर असा अंडरपास (आरयुबी) तयार करण्यात आला आहे. मनीषनगर कडून येणाऱ्या वाहन चालकांना उड्डाणपूल वरून एकमार्गी पद्धतीने विमानतळकडे वळावे लागेल आणि यु टर्न घेऊन खाली उतरावे लागेल, तर वर्धा मार्गवरुन मनीषनगरकडे जाणाऱ्या वाहन चालकांना अंडर पास मधून मनीषनगरकडे जावे लागेल.

निर्माण कार्यस्थळी सूरक्षेवर भर द्या : कोरोना व्हायरसचा प्रकोप बघता निर्माण कार्यस्थळी कामगारांची योग्य ती काळजी घेण्याचे महा मेट्रोच्या सेफ्टी चमूला सुचवले व वेळोवेळी निर्माण कार्य ठिकाणी योग्य औषध फवारणी, कामगारांचे तापमान तपासणे व मास्कचा उपयोग करून आवश्यक असे सोशल डिस्टंस पाळून कार्य करण्याचे निर्देश दिले.

यावेळी संचालक (प्रकल्प) महेश कुमार यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना मेट्रो स्टेशनची सविस्तर माहिती प्रदान केली. कार्यकारी संचालक अनिल कोकाटे, नरेश गुरबानी तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleNagpur : एयरपोर्ट मेट्रो स्टेशन पर ई- फिडर सेवा उपलब्ध
Next articleविश्व सिंधी सेवा संगम द्वारा संस्कृति और स्वास्थ्य संपदा पर आकर्षक प्रतियोगिता
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).