Home हिंदी आष्टणकर, चंदन कुमार, जाधव मेट्रोने तिकीट काढून प्रवास करा लकी ड्रॉ चे...

आष्टणकर, चंदन कुमार, जाधव मेट्रोने तिकीट काढून प्रवास करा लकी ड्रॉ चे विजेते

नागपूर ब्यूरो : महा मेट्रोने तिकीट दरात 50% सूट दिली असून प्रवासी या सेवेचा वापर करीत आहे. याच पार्श्वभूमीवर महा मेट्रो द्वारा आयोजित ‘मेट्रोने प्रवास करा व लकी ड्रॉ जिंका’ स्पर्धेचा निकाल आज घोषित करण्यात आला आहे. या लकी ड्रॉ चा मुख्य उद्देश जास्तीत जास्त नागरिकांना मेट्रोशी जोडणे हां होता.

लकी ड्रॉ प्रत्येक आठवड्यात दोनदा उघडला जात असून पहिल्या लकी ड्रॉ मध्ये तिकीट काढून प्रवास करणाऱ्या मध्ये शंकर आष्टणकर, चंदन कुमार, योगेश जाधव याची निवड झाली. तिकीट काढून प्रवास करणाऱ्या पहिल्या तीन प्रवाश्याना हा लकी ड्रॉ देण्यात आला.

महा मेट्रोच्या वतीने ऑनलाइन पेमेंट करिता जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यात येत असून महा कार्डचा वापर करणाऱ्या प्रवाश्याना देखील या लकी ड्रॉ मध्ये सहभागी करण्यात आले होते. ज्यामध्ये महा कार्ड चा वापर करून प्रवास करणारे शिलवंत मानकर, देवानंद खरात, महेश सोनावणे यांनी हा लकी ड्रॉ जिंकला. जास्तीत जास्ती नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे व सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन महा मेट्रोच्या वतीने करण्यात येत आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here