Home हिंदी महावितरणमधील् नियुक्त्या करा, अन्यथा आंदोलन: बावनकुले

महावितरणमधील् नियुक्त्या करा, अन्यथा आंदोलन: बावनकुले

574

नागपूर ब्यूरो: महावितरणमधील पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक आणि 412 शाखा अभियंता पदाच्या परीक्षा होऊन आणि अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही निवड यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे. या सर्व पदांच्या नियुक्त्याबद्दल येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत महावितरणने निर्णय न घेतल्यास 2 नोव्हेंबरपासून नागपुरातील संविधान चौकात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

महावितरण नागपूरच्या प्रादेशिक संचालक कार्यालयासमोर 15 ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला होता. पण महावितरणने या संदर्भात शासनाकडे मार्गदर्शन मागविल्याने आंदोलन तूर्तास मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र आता 30 ऑक्टोबरपर्यंत निर्णय झाला नाही तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पाच हजार विद्युत सहायकांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती पण भरती प्रक्रिया अजून घोषित करण्यात आली नाही. पदविकाधारक शिकाऊ अभियंता या 412 पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली पण निवड झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी घोषित करण्यात आली नाही.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleपिंजरे में फंस ही गया दहशत मचा रहा विरूर क्षेत्र का बाघ
Next articleमनपा च्या शिक्षकांच्या कार्याची विस्तृत माहिती दोन दिवसात सादर करा 
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).