Home हिंदी आम्रपाली संस्थेच्या निवासी विद्यार्थ्यांची मेट्रो भवनला भेट

आम्रपाली संस्थेच्या निवासी विद्यार्थ्यांची मेट्रो भवनला भेट

712

नागपूर ब्यूरो : समाजातील विविध घटकांना नागपूर प्रकल्पाची माहिती मिळावी या करता महा मेट्रोतर्फे सातत्याने प्रयत्न होत असतात. याच अंतर्गत मागील आठवड्यात नागपुरातील हुडकेश्वर भागातील मूक-बधिर विद्यार्थ्यांनी मेट्रो भवन येथील प्रशासकीय कार्यालयाला भेट दिली होती. याच शृखंलेत नागपूरच्या उदय नगर भागातील आम्रपाली उत्कर्ष संघाच्या मुलांनी आज मेट्रो भवनला भेट दिली. सेवेचे व्रत घेत ज्यांनी आपले आयुष्य शिक्षण, संगोपन आणि विविध सेवा कार्यांना वाहून दिले आहे असे नागपूरचे सेवाव्रती श्री राम इंगोले या संस्थेचे अभिभावक आहेत.

प्रशासकीय कार्यालयाच्या तळमजल्यावर व्हिजिटर्स आणि विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेल्या विविध उपक्रमांना, प्रदर्शन पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी हि मुलं आली होते. या निवासी संस्थेचे 11 मुलं मेट्रो भवनला पोचले तेव्हा महा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षेच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून मेट्रो प्रकल्पाबद्दलची संपूर्ण माहिती दिली.

कोव्हीड-19 प्रादुर्भावाची विचार करता कमी संख्येने मुलांना बोलावण्यात आले होते. तसेच मेट्रो भवनाची पाहणी करतांना मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग पासून ते सॅनिटाईज करण्यापर्यंत सर्व नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना मेट्रो भवन इमारतीत तयार करण्यात आलेल्या विविध गोष्टींची ओळख करून दिली. तळमजल्यावर बनवण्यात आलेल्या एक्स्पीरियंस सेंटर मध्ये बसून मुलांनी मेट्रोच्या विविध फिल्म पाहून त्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली.

त्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मेट्रो अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर एग्झिबिशन सेंटर मध्ये या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रदर्शनीचे अवलोकन केले आणि आपल्याच शहराचे होऊ घातलेले सुंदर रूप पाहून आनंद व्यक्त केला. या शिवाय विद्यार्थ्यांना ऑडिटोरिअम, कँटीन, लॉबी आणि इमारतीच्या इतर गोष्टी दाखवण्यात आल्या. प्रकल्पाबद्दल माहिती आणि मेट्रो भवनचा घेतलेला अनुभव या विद्यार्थ्यांसाठी अगदी नवीन आणि आनंददायी ठरला. महा मेट्रोचा एकूणच प्रकल्प आपल्याला अतिशय आवडला असून या कार्यालयाची परत एकदा भेट द्यायला आपल्याला नक्कीच आवडेल, असेही हे विद्यार्थी म्हणाले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleमहाराष्ट्र के पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस कोरोना पॉजीटिव
Next articleनागपुर : सभी मेट्रो स्टेशनों पर पर्याप्त पार्किंग की व्यवस्था
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).