Home हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन : मास्क न लावणा-या 244 नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर न्यूज बुलेटिन : मास्क न लावणा-या 244 नागरिकांकडून दंड वसूली

474
0

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (22 ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 244 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 22 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 14023 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 53,70,500/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 52, धरमपेठ झोन अंतर्गत 56, हनुमाननगर झोन अंतर्गत 35, धंतोली झोन अंतर्गत 9, नेहरुनगर झोन अंतर्गत 9, गांधीबाग झोन अंतर्गत 17, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 12, लकडगंज झोन अंतर्गत 11, आशीनगर झोन अंतर्गत 21, मंगळवारी झोन अंतर्गत 16 आणि मनपा मुख्यालयात 6 जणांविरुध्द गुरुवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 8553 बेजबाबदार नागरिकांकडून रु 42 लक्ष 76 हजार 500 वसूल करण्यात आले आहे.


नागपुरात गुरुवारी कोरोना मुळे 14 मृत्यू

नागपूर जिल्हा आणि शहरात आता दिवसेंदिवस कोरोना चा संसर्ग कमी होत आहे. गुरुवारी जिल्ह्यात 602 पॉजिटिव मिळाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यात शहरातील 460 आणि 139 ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात गुरुवारी एकूण 14 लोकांची मृत्यू झाली. यात शहरातील 6 आणि ग्रामीण भागातील 5 आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात 737 लोकं बारे होऊन घरी गेले. आज 6706 टेस्ट करण्यात आल्याची माहिती आहे.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here