Home हिंदी व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांधला मेट्रो मित्रांशी संवाद

व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांधला मेट्रो मित्रांशी संवाद

780

नागपूर ब्यूरो : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मेट्रो सेवा सेवा पुन्हा सुरु झाली असून हळू -हळु मेट्रो प्रवासी याचा वापर करीत आहे. महा मेट्रोने तिकीट दरात 50 % सूट दिली असून प्रवासी या सेवेचा वापर करीत आहे. मेट्रोचा वापर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात करावा व याच पार्श्वभूमीवर मेट्रो भवन येथे मेट्रो मित्रांशी व्हिडियो कॉन्फरसिंगच्या माध्यमाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी संवाद साधला.

सुमारे 50 मेट्रो मित्रांनी यावेळी त्यांनी प्रकल्पाची उभारणी ते मेट्रो सेवा सुरु झाल्या पर्यंतचा अनुभव यावेळी सांगितला तसेच मेट्रो सेवा संबंधी आपले मत यावेळी व्यक्त केले. तसेच संवाद मध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना समोर आल्या ज्यामध्ये मेट्रो मित्रांसाठी ओळखपत्र तयार करणे, मेट्रो मित्र ओळख पत्र दाखवून जास्तीत जास्त प्रवाश्यांना प्रेरित करणाऱ्या मेट्रो मित्राला तिकीट दरात सूट देण्यात यावी, मेट्रो मित्रांनी त्यांचे त्यांचे ग्रुप तयार करून त्याद्वारा मेट्रोबद्दल जनजागृती करून राईडरशिप वाढवावी, स्थानकांवर तयार करण्यात आलेले इंटेरिअर ‘मेट्रो सेल्फी’ म्हणून वापरून कॉन्टेस्ट सुरु करावी, मेट्रो मित्रांनी स्थानकांवर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी जसे कि युथ फेस्ट चे आयोजन करावे, सर्व प्रकारची माहिती सोशल मीडियावर येत राहण्यासंबंधी संकल्पनेचा समावेश होता.

या सर्व नाविन्यपूर्ण संकल्पनेचा आढावा घेत महा मेट्रो द्वारे लकी ड्रॉ, सेल्फी प्रतियोगिता आयोजित करण्यात आल्या आहेत तसेच स्टेशन परिसरातील पार्किंग सुविधा,फिडर सर्विस मध्येसुद्धा वाढ करण्यात येत आहे तसेच नागपूर मेट्रो ऍप व महा कार्ड बद्दल ची माहिती जास्तीत जास्ती नागरिकांन पर्यंत सोशल मीडिया द्वारे पोहोचविण्यात येत आहे.

मेट्रो मित्रांनी अश्या सुचविल्या कल्पना
  1. मेट्रोची फीडर सेवा अधिक वाढवावी. जेणेकरून घरून गाडी काढण्याची गरज पडायला नको.
  2. मेट्रोच्या अनेक स्थानकांवर पार्किंगची व्यवस्था वाढवण्यात यावी.
  3. महा कार्डसाठी एप्लिकेशन ऑनलाईन करता यायला पाहिजे.
  4. विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात कपात.
  5. महा कार्ड वर 10% डिस्काउंट आणि तिकीट दरात 50% कपात झाल्याचे प्रमोशन वारंवार करावे.

    वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).