Home हिंदी कॅप्टिव्ह पॉवर प्रकल्पाचे वीज शुल्क कमी करण्याबाबत सरकार विचाराधीन – डॉ. नितीन...

कॅप्टिव्ह पॉवर प्रकल्पाचे वीज शुल्क कमी करण्याबाबत सरकार विचाराधीन – डॉ. नितीन राऊत

714

मुंबई ब्युरो : कॅप्टिव्ह पॉवर प्रकल्पाचे वीज शुल्क कमी करण्याबाबत अभ्यास करून सकारात्मक तोडगा काढला जाईल असे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कॅप्टिव्ह जनरेशनच्या शिष्टमंडळाला बुधवार ( 21 ऑक्टोबर) ला दिले. कॅप्टिव्ह जनरेशनच्या वीज शुल्काच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महावितरणच्या फोर्ट येथील मुख्यालयात बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली.

कॅप्टिव्ह जनरेशनच्या या शिष्टमंडळाने त्यांच्यावर वाढलेला आर्थिक बोजा आणि त्यामुळे निर्माण झालेली आव्हानं याबाबत बैठकीत एक सादरीकरण केलं. ज्याप्रमाणे औद्योगिक विभागाला वीज शुल्कात सवलत देण्यात आली, त्याप्रमाणे आम्हाला वीज शुल्क 1.20 पैशांवरून 30 पैसे इतका करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. कॅप्टिव्ह जनरेशनच्या या मागणीबाबत राज्य शासनाकडून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

मात्र जादा दराने वीज का घ्यावी असा प्रश्न यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी उपस्थित केला. मात्र कॅप्टिव्ह जनरेशनची मागणी आणि महाराष्ट्र राज्याची गरज यावर मध्यम मार्ग काढू असे गुप्ता यांनी यावेळी म्हटले. तर कॅप्टिव्ह जनरेशनच्या शिष्टमंडळानेही न्यायालयात लढा देण्यापेक्षा यावर मार्ग काढण्याबाबत अनुकूलता दर्शवली.
वीज दराच्या या प्रश्नाबाबत सरकार विचाराधीन असून यावर सरकारकडून सकारात्मक तोडगा काढला जाईल असे आश्वासन डॉ. राऊत यांनी दिले. तसेच याबाबत येत्या 8 दिवसात अभ्यास करून बैठक घेऊन निर्णय कळविण्यात येईल असे राऊत यांनी शिष्टमंडळाला सांगितले. या बैठकीला कॅप्टिव्ह जनरेशनचे अध्यक्ष विकास पतंगे, संचालक नितीन घोरपडे आणि प्रतिनिधी सुब्रत राथो उपस्थित होते.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).

Previous articleसन्मान स्त्री शक्तीचा : वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मंगला केतकर यांचे योगदान अतुलनीय
Next articleहेल्थ इस वेल्थ : “चेंज द गियर” ग्रुप साइकिलिंग कर दे रहा हैं फिट रहने का संदेश
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).