Home हिंदी नागपूर न्यूज बुलेटिन : मास्क न लावणा-या 254 नागरिकांकडून दंड वसूली

नागपूर न्यूज बुलेटिन : मास्क न लावणा-या 254 नागरिकांकडून दंड वसूली

487
0

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (20 ऑक्टोंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 254 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 1 लक्ष 27 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी 13491 नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. 51,04,500/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 49 , धरमपेठ झोन अंतर्गत 60 , हनुमाननगर झोन अंतर्गत 26 , धंतोली झोन अंतर्गत 15 , नेहरुनगर झोन अंतर्गत 13 , गांधीबाग झोन अंतर्गत 16 , सतरंजीपूरा झोन अंतर्गत 12 , लकडगंज झोन अंतर्गत 11 , आशीनगर झोन अंतर्गत 14 , मंगळवारी झोन अंतर्गत 35 आणि मनपा मुख्यालयात 3 जणांविरुध्द मंगळवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 8021 बेजबाबदार नागरिकांकडून रु 40 लक्ष 10 हजार 500 वसूल करण्यात आले आहे.


मातेची दिशाभूल करून बाळाला परस्पर विकले

महिला निराधार असल्याचा गैरफायदा घेऊन तिची दिशाभूल करत बाळाला परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वर्धा येथील चाइल्ड लाइनकडे तक्रार आली होती. अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. महिलेचे हैदराबाद येथे नरेश चिकटे यांच्याशी लग्न झाले. तिथे मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन झाल्यामुळे तिच्या पतीने तिला तुरकमारी बुट्टीबोरी येथे त्यांच्या घरी घेऊन आला. तिच्या पतीला दारूचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन महिलेला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून महिलेने बुट्टीबोरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार केली होती. तिच्या पतीने तिला घराबाहेर काढले. ती त्यावेळी 6 महिन्यांची गर्भवती होती. अशा परिस्थितीत बुट्टीबोरी येथील एका महिलेने तिला तिच्या भोजनालयात आश्रय दिला. तिची प्रसूती होईपर्यंत काळजी घेतली.

प्रसूती झाल्यावर तिचा परिचय प्रयाग डोंगरे नामक व्यक्तीशी झाला. त्याचे आश्रम असल्याचे तो सांगू लागला. त्यावरून ती त्याच्यासोबत गेली आणि पुनर्जन्म आश्रमात राहू लागली. दोन महिन्यांनी महिलेला तिचे आधार कार्ड काढायच्या बहाण्याने नागपूर येथे घेऊन गेला आणि एका दापत्याला तिचे बाळ दत्तक देण्यासाठी बेकायदा दत्तक पत्र तयार करून घेतले. महिलेकडून तिच्या बाळाला हिरावून घेतले व परस्पर बाळाला दत्तक दिले, अशी माहिती मिळाली. त्यावरून चाइल्ड लाइन वर्धा यांनी वर्धा येथील बालकल्याण समितीसमोर महिलेला हजर करण्यात आले. समितीसमोर आपबीती सांगितल्यानंतर, समितीने तातडीने बैठक घेऊन नागपूर येथील बालकल्याण समिती यांना पत्र दिले. चाइल्ड लाइनला संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here